अध्यक्षांची खुर्ची व टेबल गायब झाल्याची अजब घटना घडली. याबाबत तंटामुक्त अध्यक्षांनी उपसरपंचांनी खुर्ची पळविल्याची तक्रार महागाव पोलिसांत दिल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
तंटामुक्ती समिती अध्यक्ष शमशेर खान यांनी उपसरपंच व आणखी एकाने आपली खुर्ची पळवून नेल्याची तक्रार महागाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. येथील तंटामुक्त समितीला उत्कृष्ट कार्याबद्दल १० हजारांचे पारितोषिक मिळाले आहे. या पारितोषिकातील काही रकमेमधून तंटामुक्त अध्यक्षांसाठी खुर्ची, टेबल घेण्यात आले. ही खुर्ची व टेबल ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आले होते.
तंटामुक्तीच्या मिटिंगमध्ये या टेबल व खुर्चीचा वापर होत होता. टेबलला असलेल्या कपाटामध्ये तंटामुक्तीची महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतमधून ही टेबल व खुर्चीच गायब झाली आहे. याबाबत तंटामुक्त समिती अध्यक्ष शमशेर खान यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.