शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

अबब...धनगरवाडीत मुलांनी राबविली निवडणूक प्रक्रिया; अन् मुलांनीच निवडला मुलांसाठी सरपंच

By विलास गावंडे | Published: September 15, 2023 6:20 PM

गजानन अक्कलवार कळंब : आजच्या निवडणूकीमध्ये अनेकदा चुकीचे लोकप्रतिनिधी निर्वाचित होतात. त्यामुळे नागरिकांच्या मुलभूत समस्या जैसे-थेच राहतात. बरेचदा निवडलेल्या ...

गजानन अक्कलवारकळंब : आजच्या निवडणूकीमध्ये अनेकदा चुकीचे लोकप्रतिनिधी निर्वाचित होतात. त्यामुळे नागरिकांच्या मुलभूत समस्या जैसे-थेच राहतात. बरेचदा निवडलेल्या चुकीचा लोकप्रतिनिधीमुळे नागरिकांवर पश्चाताप करण्याची वेळ येते. यावर मात करण्यासाठी आतापासूनच शाळकरी मुलांना निवडणूक व त्याचे महत्व कळावे यासाठी धनगरवाडीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. एवढेच नाही तर मुलांनी मुलांसाठी लोकशाही पध्दतीने सरपंच आणि उपसरपंचाची निवडही केली.      आपला भारत देश लोकशाहीप्रधान आहे. निवडणूक ही या लोकशाहीची अविभाज्य महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे मुलांना आतापासूनच निवडणूक प्रक्रिया समजावी, यासाठी धनगरवाडीच्या बालगरीत बालग्रामसभेत सरपंच आणि उपसरपंच निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. दीपक कांबळे यांना ९२ पैकी ५१ मते मिळाली. त्यामुळे त्यांना सरपंच तर मोहन जाधव याला उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले.    मतदान म्हणजे काय? मतदान कसे आणि कोणाला केले जाते. मतदान करताना कुठल्या बाजू लक्षात घेतल्या पाहिजे. निवडून येणाºया लोकप्रतिनिधींच्या काय जबाबदाºया असतात. याची माहीती मुलांना देण्यात आली. बालनगरीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची जबाबदारी योग्य पध्दतीने कोण हाताळणार याविषयी चर्चा करण्यात आली. सुरुवातीला दहा नावे पुढे आली. त्यानंतर पाच नावे अंतीम करण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी काय पात्रता असावी, हेसूध्दा मुलांनीच ठरविले. उमेदवार ठरल्यानंतर त्यांना शैक्षणिक स्वरुपातील निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आली. त्यानंतर खºया अर्थाने प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झाली. काही दिवस हा प्रचार चालला.      निवडणूकीच्या दिवशी मताधिकार बजावण्यासाठी मुले गोळा झाली. गावातील नागरिकही या प्रक्रियेत सहभागी झाले. मतदान करताना यादीत नाव कसे शोधायचे. आपले ओखळपत्र दाखवावे लागते. बोटाला शाई लावावी लागते. आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या चिट्टीवर शिक्का अथवा बटन दाबून मतदान करावे लागते. मतदान कोणाला केले हे सांगायचे नसते. याची माहीती विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्यांनी ही प्रक्रिया बॅलेट पेपरवर स्वत: राबविली.     मतमोजणीची प्रक्रिया गावातील मोठ्या मंडळीच्या पुढाकारातून पार पडली. विजयी उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले. जिंकलेल्या मुलाच्या नावाची घोषणा होताच मुलांनी  मोठा जल्लोष केला. जिंकुन आलेल्या आपल्या सहकाºयांना गुलाल लावून, फेटा घालून, ताशा वाजवित गावातील नंदूभाऊच्या सायकलवर रॅली काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला. मतदान प्रक्रिया नेमकी कशी असते आणि त्याचे महत्व विषद करण्यासाठी या वास्तववादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा प्रत्यय मुलांना आला. यासाठी प्रणाली जाधव, धम्मानंद बोंदाडे यांचा पुढाकार होता.