शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

अभिजितचा खून पतंगाच्या वादातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 9:40 PM

केंद्रीय विद्यालयाचा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अभिजित टेकाम याच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.

ठळक मुद्देअखेर रहस्य उलगडले : तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांची कबुली, नशेच्या अंमलात केले कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय विद्यालयाचा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अभिजित टेकाम याच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. हा खून पतंगाच्या क्षुल्लक कारणातून झाल्याचे निष्पन्न झाले. तीन विधीसंघर्ष बालकांनी नशेच्या अंमलात हे कृत्य केल्याचे पोलिसांपुढे कबूल केले. यासोबत सूरजनगर परिसरात बालकांमधील नशेचे धक्कादायक वास्तवही पोलिसांनी समाजापुढे आणले आहे.अभिजित दीपक टेकाम (१२) रा. डेहणकर ले-आऊट यवतमाळ, या बालकाचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी पोलिसांना आढळून आला होता. घटनेनंतर सातव्या दिवशी खुनाचे रहस्य उलगडण्यात उपविभागीय पोलीस अधिकार पीयूष जगताप यांच्या नेतृत्वातील विविध पथकांना यश आले. यात पोलिसांनी तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. अभिजित हा शुक्रवारी सायंकाळी ट्युशनवरून परत येत होता. तेव्हा त्याला कटलेली पतंग दिसली. ही पतंग मिळविण्यासाठी तो झुडपी जंगल परिसरात गेला. मांजा गुंडाळत असताना तिघांनी त्याच्या जवळचा पतंग हिसकावून घेतला. अभिजितने विरोध करताच नशेच्या अंमलात असलेल्या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. यात अभिजित बेशुद्ध पडला. नंतर त्याला ओढत नेऊन सागाच्या झुडपात टाकले. तिघेही एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी सलग तिनदा अभिजितच्या डोक्यावर मोठा दगड टाकला. यात अभिजित जागीच गतप्राण झाला. त्यानंतर तिघेही घराकडे निघून गेले.अभिजित शुक्रवारी सायंकाळी ४ वाजतापासूनच बेपत्ता होता. तो शिकवणीला गेल्यानंतर घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रारी दिली. मात्र दुसºया दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांपुढे मारेकरी शोधण्याचे आव्हान होते. सुरूवातीला पोलिसांनी या परिसरात भटकणाºया तरूणांवर लक्ष केंद्रीत केले. या भागात नशा करण्यासाठी अनेक जण येत असल्याचे सांगण्यात येत होते. हा धागा पकडून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आणि सहा दिवसानंतर अभिजितचे मारेकरी सापडले. हा आव्हानात्मक तपास पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, एलसीबीचे निरीक्षक संजय देशमुख, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पाच पथकांनी केला. त्यात टोळी विरोधी पथकाचे प्रशांत गिते, संतोष मनवर, वडगाव रोड शोध पथकाचे सुगत पुंडगे, गोरख चौधर, स्थानिक गुन्हे शाखेतील सारंग मिराशी यांच्यासह ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघण, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशीष गुल्हाने, विनोद राठोड, बंडू मेश्राम, आकाश सहारे, आकाश मसनकर, शशिकांत चांदेकर, सूरज गजभिये, जयंत शेंडे, शंकर भोयर यांचा समावेश आहे.तिघांचीही बालनिरीक्षण गृहात रवानगीअभिजितच्या खून प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना गुरूवारी येथील बाल न्यायमंडळापुढे हजर करण्यात आले. त्यानंतर या तिघांचीही रवानगी बाल निरीक्षण गृहात करण्यात आली आहे. या तिघांमध्ये एक सतरा वर्षीय, तर दोघे सातव्या वर्गाचे विद्यार्थी आहेत. हे तिघेही सूरजनगर परिसरातीलच रहिवासी असून त्यांना नशा करण्याची सवय असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या तिघांनीही खून कसा केला, याचे प्रात्यक्षिकही वडगाव रोड ठाण्यात शोध पथकाला करून दाखविले.