जिल्हा बँक : पांढरकवडा व्यवस्थापक, रोखपालाचा निष्काळजीपणा, शो-कॉज जारीयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पांढरकवडा शाखेतून चक्क नऊ अब्ज रुपयांचे (९०० कोटी) ‘ट्रान्जेक्शन’ आरटीजीएसद्वारे केले गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी व्यवस्थापक व रोखपालाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.पांढरकवडा शहर शाखेतून सोमवारी ९ अब्ज ४० कोटी ३८ लाख २६ हजार ७८८ रुपयांचे आरटीजीएस ‘ट्रान्जेक्शन’ करण्यात आले. जिल्हा बँकेचे नागपुरातील एस बँकेत (स्पॉन्सर) क्रेडीट अकाऊंट आहे. या खात्याची लिमिट दोन कोटींची आहे. मात्र क्रेडीट अकाऊंट असल्याने नऊ अब्ज रुपयांचे ‘ट्रान्जेक्शन’ झाले. विशेष असे पांढरकवडा शाखेने पास केलेले हे ‘ट्रान्जेक्शन’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यवतमाळ स्थित मुख्य शाखेतूनही पास करण्यात आले. ही चूक लक्षात आल्यानंतर लगेच गेलेली रक्कम रिकव्हरही करण्यात आली. परंतु बँकींग क्षेत्रातील हा सर्वात मोठा हलगर्जीपणा मानला जात आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यवतमाळ मुख्य शाखेतून पांढरकवडा शहर शाखेचे व्यवस्थापक व कॅशिअर या दोघांना मंगळवारीच कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या तिघांवरही अक्षम्य निष्काळजीपणाची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक नऊ अब्ज रुपयांच्या ‘ट्रान्जेक्शन’चा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ‘एस’ बँकेने तो पास न करता थांबविण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र क्रेडीट खाते असल्याने नाईजालाने तो मंजूर केला गेला. पांढरकवडा शाखेला नोटीस दिली गेली असली तरी यवतमाळ मुख्यालयातून नऊ अब्जच्या ‘ट्रान्जेक्शन’ला ग्रीन सिग्नल देणाऱ्या वरिष्ठांचे काय असा प्रश्न विचारला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अबब ! नऊ अब्जचे ‘ट्रान्जेक्शन’
By admin | Published: January 21, 2016 2:11 AM