दारव्हा : तालुक्यातील बोदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत एक हजार १८२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
या केंद्रांतर्गत परिसरातील विविध गावे येतात. या गावांमधील ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने लस घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन राठोड यांनी केले आहे. आतापर्यंत एक हजार १८२ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. सुजाण नागरिकांनी आपल्या संपर्कातील ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहनही डाॅ. राठोड यांनी केले. कोरोनाचा संसर्ग दारव्हा तालुक्यात वाढत आहे. या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी बोदेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला गती देण्यात आली. परिसरातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन शासनातर्फे डाॅ. सचिन राठोड यांनी केले आहे.