जवळा : नागपूर ते तुळजापूर महामार्गावर दुभाजक नसल्यामुळे आर्णी तालुक्यातील जवळा येथे शुक्रवारी रात्री ७ वाजता पुन्हा अपघात घडला. यात ऑटोरिक्षा चालक जखमी झाला.
नजीकच्या दारव्हा फाटा येथून जवळा गावात येण्याकरिता रस्ता नाही. दुभाजक असल्यामुळे वाहनांची आवक-जावक विरुद्ध दिशेने होते. शुक्रवारी अतुल अशोक चव्हाण (२५) हा ऑटोरिक्षाने (क्र. एमएच २९/८१४७) जवळावरून यवतमाळकडे जात होता. त्याचवेळी शेख अफसर आर्णीवरून यवतमाळकडे बोलेरो वाहनाने (एमएच २९/बीई ०६२३) जात होता. त्याचे वाहन दारव्हा रोड समजून जवळाकडे वळले अन् दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात ऑटोरिक्षा चालक अतुल चव्हाण गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी गावकरी पोहोचले. त्यांनी अतुलला उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नागेश जायले, जमादार अरुण चव्हाण करीत आहे.