शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

यवतमाळमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 8:45 PM

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

कळंब (यवतमाळ) : अस्थी विसर्जन करून परतणारे वाहन दरीत कोसळून आठ जण ठार, तर १६ जण जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास कळंब-जोडमोहा मार्गावर असलेल्या वाढोणा गावादरम्यान घडली. मृतांमध्ये चालकासह सहा पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. 

अमर आत्राम (२७) चालक, महादेव चंदनकर (६२), किसन परसंकर (६०) रा.जोडमोहा, महादेव बावनकर (५३) रा.शेंदूरजना घाट, गणेश चिंचोळकर (५२) रा.महागाव, अंजना वानखडे (६०), सरस्वताबाई दाभेकर (६८) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. एका मृताचे नाव कळू शकले नाही.

जोडमोहा येथील बाबाराव वानखडे (५५) यांच्या अस्थी विसर्जनासाठी कुटुंबातील सदस्य व आप्तेष्ट कोटेश्वर (जि.वर्धा) येथे पीकअप मॅजीक वाहनाने (एम.एच.३१/एफसी-२७७४) गेले होते. हा विधी पूर्ण करून जोडमोहा येथे परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन वाढोणाजवळील दरीत कोसळले.

या घटनेत पाच जण जागीच ठार झाले. दोघांचा रुग्णालयात हलविताना मृत्यू झाला. नरेंद्र वखरकर (४०), सूमन बावने (६५), किरण वानखडे (३२), संतोष मेश्राम (३५), सुमित्रा काळे (६५), शिवम (१४), प्रकाश सोनटक्के, बेबी सोनटक्के (७०), रवी वानखडे (३५), संदीप लोखंडे (२५), पंकज सोनुले (३०), उमेश वेट्टी (३५), पांडुरंग सूर्यवंशी (४९), अंकुश वानखडे (३१), गणेश वानखडे (१८), रामचंद्र बावने (४०) हे जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात आहेत.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न  केला. कळंबचे ठाणेदार विजय राठोड सहका-यांसह  घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढून शवचिकित्सेसाठी रवाना केले, तर जखमींना रुग्णालयात हलविले. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळ