ठळक मुद्देशिवशाही व मेटॅडोरची धडक
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: नागपूर रोडवर असलेल्या चापर्डा शिवारात गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास शिवशाही बस व मेटॅडोरच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर १५ जण जखमी झाल्याची घटना घडली.या मार्गावर असलेल्या चापर्डा येथे शिवशाही बस व मेटॅडोरमध्ये समोरासमोर धडक झाली व तीत मेटॅडोर चालक शंकर आलट (४५) रा. चाकूर, जि. लातूर याचा जागीच मृत्यू झाला. बसचालकासह १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या मार्गाच्या बांधकामाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व अरुंद रस्ते याला वाहन चालकांना तोंड द्यावे लागते. अशातच वेगात आलेल्या या दोन वाहनांची धडक होऊन हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते.