करंजी येथील घटना : पोलिसाच्या वाहनाने भांडे विक्रेता ठार पांढरकवडा : तालुक्यातील करंजी येथे पोलिसाच्या वाहनाने धडक दिल्याने भांडे विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वडकीचे ठाणेदार अमोल माळवी यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील करंजी येथे बुधवारी वडकी पोलीस ठाण्याच्या जीपने दुचाकीला धडक दिली होती. त्यात शाहरूख बेग अहमद बेग (१९) रा.लाडखेड ठार झाला, तर त्याचा सहकारी इफ्तेखार बेग अहमद बेग (३५) रा.नेर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर यवतमाळ रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नियमित चालक सुटीवर असल्याने सदर पोलीस वाहन वडकीचे ठाणेदार अमोल माळवी चालवित होते. पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी जात होते. त्यावेळी करंजी येथील मोठ्या उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला होता. याप्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात अखेर पोलीस वाहन चालवित असलेले ठाणेदार माळवी यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी) तर अपघात टळला असताशाहरूख बेग व इफ्तेखार बेग करंजी येथील पेट्रोल पंपावर आपल्या पेट्रोल भरून वडकीसाठी निघाले होते. परंतु ते चुकीच्या उजव्या बाजूने महामार्गावरुन वडकीसाठी निघाले. काही अंतर पार करीत नाही तोच पोलीस जीपने शाहरूखचा घात केला. हे दोघेही नेहमी उड्डाणपुलाचा बोगदा क्रॉस करून डाव्या बाजुने जायचे. परंतु बुधवारी चुकीच्या मार्गाने गेले आणि त्यातच घात झाला.
वडकी ठाणेदारावर अपघाताचा गुन्हा
By admin | Published: August 26, 2016 2:26 AM