लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गुणगौरव करण्यात आला. यात डॉ.राजेश संभे, प्रा.सागर जिरापुरे, रियाज अहमद खान, अमित होळकुंडकर यांचा समावेश आहे.विभाग प्रमुख व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इनोवेशन, इन्क्युबेशन अॅन्ड इंटरप्राईज बोर्डचे सदस्य असलेले डॉ. राजेश संभे यांना सन २०१९ चा इंडिया अचिव्हर्स अवॉर्ड प्राप्त झाला. बंगलोर येथील सोहळ्यात माजी विश्वसुंदरी व सिनेतारका दिया मिर्झा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच युनिव्हर्सिटी आॅफ डोमिनिकाशी संलग्न डॉ.पी.व्ही. पवार रिसर्च सेंटर नाशिक यांचा मानाचा असलेला लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड-२०१९ नाशिक येथे डॉ.संभे यांना प्रदान करण्यात आला. तंत्रशिक्षणातील निरंतर उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो.डॉ.संभे हे बॉल्सब्रिज युनिर्व्हसिटी, डोमिनिका येथे फेलो चार्टर्ड मेंबर म्हणून कार्यरत आहे. जगातील शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदांवर आणि जर्नल्सवर आंतरराष्ट्रीय कमिटी मेंबर म्हणून कार्य करत आहे.जिरापुरे, खान, होळकुंडकर सन्मानितजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्रेहमिलन सोहळा ‘युफोरिया-१९’मध्ये प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा.सागर जिरापुरे यांना बेस्ट टिचर, तर रियाज अहमद खान यांना बेस्ट नॉनटिचिंग टेक्निकल तर अमीत होळकुंडकर यांना बेस्ट नॉनटिचिंग नॉन टेक्निकल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ.रामचंद्र तत्त्ववादी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘जेडीआयईटी’चे संभे यांना अचिर्व्हस अवॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:26 PM