लोकमत न्यूज नेटवर्कवणी : राज्यभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वणी पोलिसांनी अकारण रस्त्यावर भटकणाºयांविरूद्ध शुक्रवारपासून पुन्हा एकदा मोहीम तीव्र केली आहे. रस्त्यावरून जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र मास्क न लावताही दुचाकीने फिरणाºया अनेकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.स्थानिक साई मंदिर चौकात सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ही मोहीम आरंभ करण्यात आली. मध्यंतरी पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई कमी केली होती. परंतु शुक्रवारी ही मोहीम तीव्र करण्यात आली. यावेळी अनेकजण तोंडाला मास्क बांधून नसल्याचे दिसून आले. अशांना अडवून त्यांना दंड ठोठावण्यात आला. तसेच अकारण बाहेर फिरणाºयांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच वणी शहरातील रस्त्यांवर वाढणारी गर्दी चिंतेचा विषय बनू लागली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ही गर्दी दिसून येते. त्यानंतर औषध विक्रीची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहत असल्याने नागरिक स्वयंस्फुर्तीने आपापल्या घरात थांबत असल्याचे चित्र वणीत पहायला मिळते.लॉकडाऊननंतर काही दिवस सकाळची गर्दीही कमी झाली होती. पोलिसांनी त्या काळात अनेकांना दंडुक्याचा प्रसाद दिला. परिणामी अकारण रस्त्यावर भटकरणाºयांची गर्दी कमी झाली. कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टसिंग हा एकमेव पर्याय असताना, याबाबत दररोज जागृती केली जात असतानाही लोक याविषयात गंभीर नसल्याचे दिसून येते. अलिकडे सकाळी ७ वाजतापासूनच शहरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येते. ही गर्दी दुपारी २ पर्यंत असते. या काळात अनेक ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडलेला दिसतो. हीच बाब घातक आहे. यावर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
मास्क न लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:00 AM
स्थानिक साई मंदिर चौकात सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ही मोहीम आरंभ करण्यात आली. मध्यंतरी पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई कमी केली होती. परंतु शुक्रवारी ही मोहीम तीव्र करण्यात आली. यावेळी अनेकजण तोंडाला मास्क बांधून नसल्याचे दिसून आले. अशांना अडवून त्यांना दंड ठोठावण्यात आला. तसेच अकारण बाहेर फिरणाºयांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
ठळक मुद्देवणीत मोहीम तीव्र : अनेकांना ठोठावला दंड, अकारण फिरणाऱ्यांची गर्दी वाढली