शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

बेलगाम वाहतुकीवर धडक कारवाई

By admin | Published: June 14, 2014 11:52 PM

शहर आणि परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो, या आशयाचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये उमटताच वाहतूक पोलिसांनी बेलगाम वाहतुकीविरुद्ध

वणी : शहर आणि परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो, या आशयाचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये उमटताच वाहतूक पोलिसांनी बेलगाम वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. या कारवाईतून शुक्रवारी सुमारे १२५ वाहनधारकंकडून तब्बल १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.येथील टिळक चौकातील नगरपरिषद कॉम्प्लेक्ससमोर दिवसभर वाहने अस्ताव्यस्त उभी राहातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याच चौकात ट्रॅव्हल्सही उभ्या राहातात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. या बेलगाम वाहतुकीचा शहरावासीयांना त्रास सहन करावा लागतो. सामान्य नागरिक, पादचारी, विद्यार्थी, महिला आदींना या बेशिस्त वाहतुकीचा प्रचंड त्रास होतो. त्यांना रस्त्याने चालणे कठीण होते. त्यातच रस्त्याच्या आजूबाजूला आॅटोही उभे राहतात. इतर वाहनांचीही गर्दी असते. सोबतच विविध हातठलेवाल्यांचीही तेथे प्रचंड गर्दी असते. या गर्दीतून वाट काढताना अक्षरश: दमछाक होते. गर्दीतून वाहन काढताना या चौकात अनेकदा किरकोळ अपघात घडतात.या सर्व बाबींकडे गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत होते. याबाबत शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त उमटताच वाहतूक पोलिसांना जाग आली. वाहतूक शाखेचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी वाहतूक शाखा चांगलीच कामी लागली. त्यांनी टिळक चौकात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केली. दुचाकी, आॅटो, ट्रक, मिनी बस, ट्रॅव्हल्स आदी अनेक वाहने वाहतूक शाखेत जमा करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या पथकाने वरोरा रस्ता, गांधी चौक, डॉ.आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर, आदींकडे मोर्चा वळून वाहतुकीला शिस्त लावली. लालपुलिया परिसरातही अनेक ट्रकविरुद्ध कारवाई करण्यात आली. तेथे कारवाई करून वाहतुकीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील तहसील, पंचायत समिती, न्यायालय, उपविभागीय कार्यालय, पोलीस ठाणे परिसरात वाहनांची प्रचंड वर्दळ असते. नागरिक रस्त्यावरच वाहने उभी ठेवतात. तेथे दगडांना पांढरा रंग मारून वाहने उभे न ठेवण्याची सूचनाही देण्यात आली. तरीही अनेक वाहनधारक तेथेच वाहने उभी ठेवतात. शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी अशी सर्व वाहने वाहतूक शाखेत जमा केली. सोबतच रस्त्याच्या कडेला असलेल्या काही फळ, भाजी विक्रेत्यांनाही समज देण्यात आली. त्यांना दुकाने मागे घेण्यास सांगण्यात आले. शहरातील काही रस्ते शुक्रवारी सुटसुटीत दिसत होते. मात्र पोलीस वळताच पुन्हा काही ठिकाणी ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी बाजारपेठ बंद असते. त्यामुळे वाहनांची वर्दळही कमी होते. त्यामुळे आज वाहतूक पोलीस निर्धास्त होते. वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य चौक व लालपुलिया परिसरात दररोज अशीच कारवाई सुरू ठेवावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)