उदय पुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील बंदीभागातील परोटी येथे स्वातंत्र्याच्या तब्बल ७० वर्षानंतर शुक्रवारी एसटी बस पोहोचली. बस गावात येताच गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.परोटी हे गाव उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम व डोंगराळ परिसरात वसले आहे. बंदी भागातील या गावात आजपर्यंत कधीही एसटी महामंडळाची बस आली नाही. रस्ते दयनीय असल्यामुळे गावकऱ्यांची बसची मागणी आतापर्यंत अपूर्णच होती. शेवटी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे गावकऱ्यांनी रेटा लावला. पाटील यांनी एसटी महामंडळाला पत्र दिले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास परोटी गावात बस अवतरली. गावात बस येणार असल्याने गावकरी एकत्रित झाले होते. बस गावात येताच त्यांनी बसला फुलांनी सजविले, पूजा केली. चालक दीपक देशमुख आणि वाहक सुप्रिया कदम यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.यावेळी उमरखेडचे एटीआय नवाज जानी, वरिष्ठ लिपिक शेषराव इंगळे, परोटी येथील मारोती संकुळवाड, सरपंच शीतल तगरे, धनराज तगरे, बाबूसिंग जाधव, सदाशिव वानखेडे, मारोती पिलवंड, सुनील गरड, भीमराव पाटील, साहेबराव पाटील, भगवान वायकुळे, प्रवासी मंडळाचे सचिव इरफान आदी उपस्थित होते.बस सुरू झाल्याने गाव व परिसरातील नागरिकांना ४० किलोमीटर अंतरावरील तालुक्याचे उमरखेड हे ठिकाण गाठणे सोईचे झाले आहे. आतापर्यंतचा खडतर प्रवास या बसमुळे सुलभ झाल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली.
७० वर्षानंतर परोटी येथे पोहोचली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 6:00 AM
परोटी हे गाव उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम व डोंगराळ परिसरात वसले आहे. बंदी भागातील या गावात आजपर्यंत कधीही एसटी महामंडळाची बस आली नाही. रस्ते दयनीय असल्यामुळे गावकऱ्यांची बसची मागणी आतापर्यंत अपूर्णच होती. शेवटी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे गावकऱ्यांनी रेटा लावला. पाटील यांनी एसटी महामंडळाला पत्र दिले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास परोटी गावात बस अवतरली.
ठळक मुद्देगावकरी भारावले : चालक-वाहकाचा सत्कार