शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पाच वर्षानंतर अखेर शाळांना सादिल मिळणार

By admin | Published: March 14, 2016 2:47 AM

पाच वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांचे सादिल अनुदान बंद झाले आहे. शिक्षक संघटनांच्या रेट्यामुळे अखेर मार्च महिन्याअखेर हे अनुदान शाळांच्या पदरी पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिशेब झाला सादर : शिक्षक-मुख्याध्यापकांवरील भार कमी होणारयवतमाळ : पाच वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांचे सादिल अनुदान बंद झाले आहे. शिक्षक संघटनांच्या रेट्यामुळे अखेर मार्च महिन्याअखेर हे अनुदान शाळांच्या पदरी पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शाळांमधील विविध प्रकारच्या खर्चासाठी जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी शाळांना सादिल अनुदान दिले जाते. शिक्षकाच्या मूळ वेतनाच्या चार टक्के ही रक्कम असते. राज्यात सर्वत्र दरवर्षी सादिल खर्च दिला जात असताना यवतमाळ जिल्ह्यातील शाळांना मात्र २०११ पासून ही रक्कम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे शाळेतील खर्च कसा भागवावा, हा मोठा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला. शाळेला लागणारे स्टेशनरी साहित्य, रंगरंगोटीसारख्या कामांकरिता शक्षक-मुख्याध्यापक यांना स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत होता. परंतु, आता सादिल अनुदान मिळण्याच्या मार्गातील अडचणी दूर झाल्या असून मार्चअखेरीस रक्कम शाळांना मिळेल, असे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.सादिल खर्चासाठी संचालनालयाकडून जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला दरवर्षी अनुदान पाठविण्यात येते. या रकमेचा विनियोग कसा, याचा हिशेर दरवर्षी सादर करावा लागतो. परंतु, २०१०-११ मधील खर्चाचा हिशेब शिक्षण संचालनालयाकडे सादरच करण्यात आला नाही. त्यामुळे २०११ पासून संचालनालयाने जिल्हा शिक्षण विभागाला हे अनुदान पाठविणे बंद केले. याबाबत शिक्षण विभागानेही फारसी दखल घेतल्याचे दिसले नाही. परंतु, याचा फटका मात्र सर्वसामान्य शिक्षकांना बसला. साहजिकच शिक्षक संघटना या मुद्यावर आक्रमक झाल्या. थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून वेळोवेळी सादिल अनुदानाचा मुद्दा शिक्षक संघटनांनी आक्रमकपणे मांडला. त्यामुळे शिक्षण विभागाला खडबडून जाग आली. धावपळ करीत सादिल खर्चाचा संपूर्ण हिशेब घेऊन एका कर्मचाऱ्याला पुण्याला पाठविण्यात आले. शिक्षण संचालनालयाकडे पूर्वीचा सर्व हिशेब सादर झाल्यामुळे आता चालू वर्षातील सादिल अनुदान शाळांना मिळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)