लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी अरुणावती च्या पात्रात यावर्षी प्रथमच पाणी वाहताना दिसले.चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आनंदला आहे. अरुणावती नदीच्या पाण्यावर शेतीसह आर्णी तथा ग्रामीण भागातल्या अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. नदीत पाणीच नसल्याने अनेकांची काळजी वाढली होती. परंतु गुरुवारच्या पावसाने दिलासा दिला.गुरूवारी २७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जोरदार विजांच्या कडकडाटासह हा पाऊस झाला. त्यामुळे शहरातील मेनरोड वरील अनेक दुकानातील टीव्ही संच निकामी झाले. इतरत्र मात्र फारशा नुकसानीची नोंद नाही.
अखेर अरुणावती लागली वाहायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:54 PM