लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. तरीही नियमांचा फज्जा उडवत जवळपास १०५ ऊसतोड कामगार पाच ट्रॅक्टरमधून वर्धा ते पुसद असा तब्बल दीडशे किलोमिटरपेक्षा जास्त प्रवास लेकराबाळांसह करत पुसदला पोहोचले. गस्तीवर असणाऱ्या पुसद पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या कामगारांची तालुका कोरोना नियंत्रण पथकाने आरोग्य तपासणी केली. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली नसल्याची माहिती आहे.तालुक्यातील बेलोरा व पन्हाळासह वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील १०५ ऊसतोडणी कामगारांना मुकादम अंगद कृष्णा करे रा. नायगाव जि. उस्मानाबाद यांनी वर्धा जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी नेले होेते. लॉकडाऊनमुळे कामगार तेथेच अडकले. महिला, मुलांसह हे सर्व १०५ कामगार १२ एप्रिलला रात्री वर्धा येथून निघाले. यवतमाळ मार्गे पुसदला १३ एप्रिलला दुपारी पोहोचले. जिल्हाबंदी व ठिकठिकाणी चेकपोस्ट असताना सदर कामगारांना वाटेत कोणीही हटकले नाही, हे आश्चर्य आहे. मात्र पुसदला पोहोचताच येथील माहूर फाट्यावर गस्तीवर असलेले वाहतूक पोलीस अजमल खान व त्यांच्या पथकाने ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली. शहर पोलिसांनी तहसीलदार प्रा. वैशाख वाहुरवाघ व तालुका कोरोना नियंत्रण पथकाला पाचारण केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांच्या मार्गदर्शनात डॉ. दिनेश चव्हाण व चमूने कामगारांची आरोग्य तपासणी केली.पांढुर्णा जिल्हा परिषद शाळेच्या कॅम्पमध्ये ठेवणारवर्धा भागातून शंभरपेक्षा अधिक ऊसतोड मजूर ट्रॅक्टरने पुसदला आले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी झाली आहे. या सर्व मजुरांना पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जिल्हा परिषद शाळेत कॅम्पमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन समिती करणार असल्याची माहिती तहसीलदार प्रा. वैशाख वाहुरवाघ यांनी दिली.
लॉकडाऊन मोडून शंभरावर ऊसतोड कामगार पोहोचले पुसद शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 5:00 AM
तालुक्यातील बेलोरा व पन्हाळासह वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील १०५ ऊसतोडणी कामगारांना मुकादम अंगद कृष्णा करे रा. नायगाव जि. उस्मानाबाद यांनी वर्धा जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी नेले होेते. लॉकडाऊनमुळे कामगार तेथेच अडकले. महिला, मुलांसह हे सर्व १०५ कामगार १२ एप्रिलला रात्री वर्धा येथून निघाले. यवतमाळ मार्गे पुसदला १३ एप्रिलला दुपारी पोहोचले. जिल्हाबंदी व ठिकठिकाणी चेकपोस्ट असताना सदर कामगारांना वाटेत कोणीही हटकले नाही, हे आश्चर्य आहे.
ठळक मुद्देदीडशे किमीचा प्रवास : पुसदमध्ये पोहोचताच फुटले बिंग