लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : विविध मागण्यांना घेवून कृषी सहायकांनी येथे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मृद व जलसंधारणाला पद हस्तांतरणापूर्वी कृषी विभागाचा आकृतीबंध सादर व्हावा, कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी करावे, कृषी सहायकामधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी आश्वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावा आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष पी.एस. धुमाळ, उपाध्यक्ष पी.एल. जाधव यांनी दिला आहे. आंदोलनात जिल्हा खजिनदार के.व्ही. कामडी, कार्याध्यक्ष के.एन. वायकुळे, सचिव डी.व्ही. वैद्य, कोषाध्यक्ष व्ही.जी. वाघमारे, उपाध्यक्ष जी.एस. कचारे, व्ही.डी. मुळाटे, महिला संघटक एस.डब्ल्यू. येरमा, जिल्हा महिला प्रतिनिधी डी.व्ही. पोथारे, पी.सी. मेश्राम, सी.व्ही. मासाळ आदी सहभागी झाले होते.
राळेगावात कृषी सहायकांचे आंदोलन
By admin | Published: July 14, 2017 1:46 AM