लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथील ग्रामीण रूग्णालयात २८८ दिवे प्रज्वलीत करून युवा शेतकरी संघटनेने रूग्ण व कर्मचाºयांसह निषेधात्मक दिवाळी साजरी केली.राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शतकरी आत्महत्या होत आहे. शेतकरी, शेतमजुरांना विषारी कीटकनाशकांमुळे जीव गमवावे लागत आहे. याचा संघटनेने निषेध नोंदविला. तसेच मृत शेतकरी, शेतमजुरांना २८८ दीवे लावून श्रद्धांजली अर्पण केली. राज्यात मुख्यमंत्र्यांसह २८८ आमदार आहे. त्यांचा निषेध म्हणून त्यांच्या नावाचे हे २८८ दीवे लावण्यात आले होते.या दिव्यांवर निषेध असे लिहण्यात आले होते. भाजपाने २0१४ च्या निवडणूक जाहिरनाम्यात शेती मालाला ऊत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा देऊन आधारभूत किंमत देण्याची ग्वाही दिली होती. मात्र तीन वर्षे लोटूनही राज्य सरकारने शिफारस केल्याएवढ्याही आधारभूत किंमती दिल्या नाहीत. यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप संघटनेने केला. केवळ निषेध व आंदोलन न करता, यावेळी संघटनेतर्फे शहरातील गरीब नागरिकांना तेल वाटप करून गरजूंना मदत करण्यात आली. आंदोलनात आकाश बुर्रेवार, गजानन पालेवार, सुनील हूड, संतोष अक्कलवार, गुणवंत लेनगुरे, पंकज बावणे, मंगेश कोमावर, किशोर मडगुलवार, मयूर उईके, सागर आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.
२८८ दिवे प्रज्वलित करून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 9:47 PM
येथील ग्रामीण रूग्णालयात २८८ दिवे प्रज्वलीत करून युवा शेतकरी संघटनेने रूग्ण व कर्मचाºयांसह निषेधात्मक दिवाळी साजरी केली.
ठळक मुद्देयुवा शेतकरी संघटना : मृत्युमखी पडलेल्या शेतकरी, मजुरांना घाटंजीत श्रद्धांजली