ऑनलाईन लोकमतयवतमाळ : ‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती गुरुवारी यवतमाळात उत्साहात साजरी करण्यात आली. मानवहिताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा झाला. तर अहिंसा संदेश रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.जैन धर्मीयांचे चोविसावे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जैन संघटनेच्या वतीने सकाळी ६ वाजता माळीपुरातील दिगंबर जैन मंदिरात मंगल ध्वजारोहण करण्यात आले. सात वाजता भगवान महावीरांच्या तैलचित्रासह दिगंबर जैन मंदिरापासून प्रभातफेरी निघाली. गांधी चौक, हनुमान आखाडा चौक, पाच कंदिल चौक, येरावार चौक, पोस्टल ग्राउंड, पुनम चौक, स्टेट बँक चौक, धामणगाव रोड अशा मार्गाने मार्गक्रमण करीत श्रीमत रामचंद्र ज्ञानमंदिर येथे ही प्रभातफेरी विसर्जित झाली. प्रभातफेरीमध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष परंपरागत वेशभूषेत सहभागी झाले होते. धर्मध्वजा घेऊन भगवान महावीरांचा जयघोष करीत निघालेल्या या फेरीने यवतमाळ दुमदुमले.जैन सेवा समितीतर्फे आराधना भवन येथे जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती. बोरा जैन धर्म स्थानक येथून ‘जिओ और जिने दो’ असा घोष करीत दुचाकीवर ‘अहिंसा संदेश रॅली’ काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, नगरसेवक गजानन इंगोले यांनी धर्मध्वजा दाखवून अहिंसा रॅलीचा प्रारंभ केला. ही रॅली वाघापूर येथील जैन छात्रालयात विसर्जित करण्यात आली. के. सी. बरलोटा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शासकीय रुग्णालयात फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. दहा वर्षावरील युवतींसाठी बरलोटा नर्सिंग होम येथे रुबेला व्हॅसिंग शिबिराचे आयोजन केले होते.भारतीय जैन संघटना व सकल जैन समाजाच्या वतीने महावीर जन्म कल्याण उत्सव साजरा करण्यात आला. यशस्वितेसाठी डॉ. रमेश खिवसरा, उमेश बैद, ललित जैन, आदेश लुणावत, राजेंद्र गलेडा, आनंद चौधरी, प्रवीण बोरा, कस्तुर सेठिया, अनिल ओसवाल, गौतम कटारिया, प्रमोद मुथा, अॅड. विवेक बरलोटा, संजय झांबड, सुनिल भरुट, राजेश गुगलिया, अशोक कोठारी, ललित, संतोष कोचर, सेटीया, विजय बुंदेला, रवी बोरा, मयुर मुथा, रवींद्र कोठारी, तिलक गुगलिया, अमर गुगलिया, गौतम खाबिया, श्याम भंसाली आदींसह सकल जैन समाजातील सर्वांचे सहकार्य लाभले.पाणपोईचे उद्घाटनयवतमाळ शहरात उष्णतामान वाढत असताना पाण्याची टंचाई भेडसावत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त स्टेट बँक चौकात पाणपोई लावण्यात आली. त्याचे उद्घाटन स्वाध्याय संघाचे अध्यक्ष अमरचंद गुगलिया, जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, राजेंद्र गेलेडा, डॉ. पियूष बरलोटा, प्रवीण बोरा, संजय झांबड आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. महिला मंडळातर्फे केसरिया भवनात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी देतानाच गोरगरीब रुग्णांना दिलासा देऊन भगवान महावीरांची जयंती साजरी करण्यात आली.
भगवान महावीरांच्या जयघोषात अहिंसेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:04 PM
‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती गुरुवारी यवतमाळात उत्साहात साजरी करण्यात आली. मानवहिताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा झाला.
ठळक मुद्देविविध कार्यक्रम : ध्वजारोहण, प्रभातफेरी