रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी कर्ज वाटपाची तयारी सुरू केली. यावर्षी जिल्ह्यातील बँकांना तब्बल दोन हजार १४२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ७० टक्के कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत बँकांना करावे लागणार आहे.कर्जमाफीच्या प्रक्रियेसोबतच आता कर्ज वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकार विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने जिल्हा बँकेने कर्ज वितरण सुरू केले आहे. आत्तापर्यंत जिल्हा बँकेने चार कोटींचे कर्जवाटपसुद्धा केले. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांची गती धीमी आहे. कर्ज वितरण प्रक्रियेत सर्व शेतकऱ्यांना सामावून घेण्याच्या सूचना आहेत. तसे पत्र अग्रणी बँकेने सर्व बँकांच्या शाखांना पाठविले आहे.गतवर्षी बँकांना एक हजार ८३६ कोटी रूपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. यात यावर्षी २० टक्के वाढ करण्याचे निर्देश आहे. यात सर्वाधिक कर्जाचे वितरण राष्ट्रीयकृत बँका करणार आहे. या बँकांना एक हजार ४४० कोटींचे कर्ज वितरित करावे लागणार आहे. जिल्हा बँकेला ५३९ कोटींचे उद्दीष्ट असून विदर्भ कोकण बँकेला १६२ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले.खरीप हंगामात हळद पिकाला सर्वाधिक कर्ज देण्याचा निर्णय बँक स्तरावर घेण्यात आला. हळद पिकाला हेक्टरी ९० हजारांचे पीक कर्ज दिले जाणार आहे. कापसाला हेक्टरी ५२ हजार, तर कोरडवाहू कापसाला हेक्टरी ४२ हजारांचे कर्ज मिळणार आहे. सोयाबीनला २७ ते ३७ हजार ५०० रूपयांचे हेक्टरी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. तुरीसाठी हेक्टरी २६ ते ३५ हजार रूपयांचे कर्ज मंजूर केले जाणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक कर्ज वाटपात वाढ करण्याचे निर्देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तथापि कर्जमाफी प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याने ज्यांचे कर्ज माफ झाले नाही, त्या शेतकऱ्यांना चिंता आहे.नवीन सभासदांना कर्जाची अपेक्षादरवर्षी थकीत कर्जाचे प्रमाण जादा असल्याने नवीन सभासदांना कर्जच वितरित केले जात नाही. मात्र यावर्षी कर्जमाफीमुळे बँकांची थकबाकी वसूल होणार आहे. त्यामुळे नवीन सभासदांना कर्ज मिळण्याची अशा पल्लवीत झाली आहे. अशा अनेक नवीन सभासदांना त्यांच्या बँकेकडून खरिपासाठी पीक कर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँक कर्ज वाटपास का-कू करतात, हे वास्तव आहे.ज्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली, अशा शेतकऱ्यांना मागणीनुसार नव्याने कर्ज दिले जाणार आहे.- अर्चना माळवेप्रभारी जिल्हा उपनिबंधकराष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांना कर्ज वितरणाच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्याचे पत्र त्यांना देण्यात आले.- कैलास कुमरेव्यवस्थापक, अग्रणी बँक
बँकांंना २१४२ कोटींचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 9:58 PM
यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी कर्ज वाटपाची तयारी सुरू केली. यावर्षी जिल्ह्यातील बँकांना तब्बल दोन हजार १४२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ७० टक्के कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत बँकांना करावे लागणार आहे.
ठळक मुद्देखरीप हंगाम : कर्जवाटपाची सर्वाधिक जबाबदारी राष्ट्रीयीकृत बँकांवर