शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

दिग्रस पालिका उपाध्यक्षपदी अजिंक्य मात्रे

By admin | Published: January 05, 2017 12:20 AM

येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अजिंक्य मात्रे यांची बुधवारी अविरोध निवड करण्यात आली.

स्वीकृतची निवड लांबणीवर : सर्वसाधारण सभेची पुन्हा नोटीस काढणार दिग्रस : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अजिंक्य मात्रे यांची बुधवारी अविरोध निवड करण्यात आली. परंतु दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड मात्र लांबणीवर पडली. त्यामुळे स्वीकृत सदस्यांसाठी पुन्हा सर्वसाधारण सभा घ्यावी लागणार आहे. दिग्रस नगरपरिषदेच्या सभागृहात बुधवारी दुपारी २ वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष आणि दोन स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार होती. सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी निवडीची प्रक्रिया सुरू केली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अजिंक्य मात्रे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा केली. स्वीकृत सदस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून काहीच सूचना न आल्याने मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी दुपारी ४ वाजेपर्यंत सभा तहकूब केली. परंतु यावर नूरमहमद खान, किशोर साबू, खुर्शिद बानो, के.टी. जाधव यांनी ४ वाजता सभा बोलविण्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाशी मुख्याधिकाऱ्यांनी संपर्क करावा, असे म्हटले. यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने आज स्वीकृत सदस्यांबाबत नगरपरिषदेला सूचना देण्यात येणार नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर सांगितले. त्यामुळे ही सभा तहकूब झाली. स्वीकृत सदस्यांबाबत सर्वसाधारण सभेची नोटीस पुन्हा काढण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ उपाध्यक्षांची निवड झाली. सभेला नगरसेवक उपस्थित होते. स्वीकृत सदस्यांसाठी शिवसेनेतर्फे डॉ.संदीप दुधे, डॉ.अरविंद मिश्रा यांनी, काँग्रेसतर्फे रवींद्र अरगडे, अपक्ष सुभाषचंद्र अटल, रामदास पद्मावार यांनी अर्ज सादर केले. परंतु ही प्रक्रिया रखडल्याने शहरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. (शहर प्रतिनिधी)