लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : राष्ट्रीय हॉकी संघाचे गोलरक्षक, यवतमाळचे सुपूत्र आकाश चिकटे यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार जाहीर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी राजे छत्रपती सामाजिक संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.संभाजी पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सवात चिकटे यांना सन्मानित केले जाणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार राजू तोडसाम राहतील. पांढरकवडाच्या एसडीओ एस. भुवनेश्वरी, प्रादेशिक उपवनसंरक्षक के. एम. अभर्णा, नगराध्यक्ष नयना ठाकूर, बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे, पंचायत समिती सभापती कालिंदा आत्राम आदींची उपस्थिती राहणार आहे.आकाशने २०१६ मध्ये राष्ट्रीय हॉकी संघात गोलरक्षक म्हणून स्थान मिळविले. त्यांनी आॅस्ट्रेलिया, मलेशिया, बेल्जीयम, जर्मनी, नेदरलँड संघाविरुद्ध उत्तम कामगिरी केली. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये मिळविलेले यश बघून त्यांना संभाजी पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक राजेश उदार, दीपक महाकुलकर, प्रफुल्ल अक्कलवार, संजय राऊत, राहुल खर्चे, अनिल मस्के, राजू गिरी, श्रीकांत पायताडे, प्रमोद टापरे आदींनी केले आहे.
आकाशला संभाजी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:16 PM
राष्ट्रीय हॉकी संघाचे गोलरक्षक, यवतमाळचे सुपूत्र आकाश चिकटे यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार जाहीर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी राजे छत्रपती सामाजिक संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय हॉकी संघाचे गोलरक्षक, यवतमाळचे सुपूत्र आकाश चिकटे यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार