लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : भुरकीपोड ते कान्हाळगाव या रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली असून पायदळ चालणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा रस्ताच कायमचा बंद करावा, अशी मागणी संतप्त कान्हाळगाववासीयांनी केली आहे.तालुक्यातील शेवटचे टोक म्हणून कान्हाळगावची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही या भागातील गावांना रस्ते नाही. या गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. त्यानंतर मात्र पुढील शिक्षणासाठी मारेगाव येथे जावे लागते. परंतु तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. २० वर्षापूर्वी या रस्त्याचे खडीकरण झाले. परंतु आजतागायत रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी बिकट झाला आहे. या रस्त्याने पायदळ चालणेदेखिल कठीण झाले आहे.
रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 9:20 PM