शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

उमरखेड तालुक्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांची दमछाक

By admin | Published: December 26, 2016 1:54 AM

लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा तालुक्यात ज्वर चढला आहे.

जिल्हा परिषद निवडणूक : संभाव्य उमेदवारांनी केला प्रचार सुरू उमरखेड : लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा तालुक्यात ज्वर चढला आहे. उमरखेड तालुक्या सहा जिल्हा परिषद आणि १२ पंचायत समिती सदस्य आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, सेना अशा सर्वच पक्षांच्या नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे चिन्ह आहे. उमरखेड तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद सदस्य आहेत. यामध्ये मुळावा, पोफाळी, ढाणकी, निंगणूर व विडूळ यांचा समावेश आहे. याठिकाणी काँग्रेसचे सदस्य आहेत. तर दराटीमध्ये भाजपाने यश मिळविले होते. पंचायत समिती सदस्य एकूण १२ आहेत. त्यामध्ये मुळावा, बेलखेड, पोफाळी, सुकळी, विडूळ, ढाणकी, निंगणूर यामध्ये कॉंग्रेसचे तर ब्राह्मणगाव, कुरळी व चातारी या तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. बिटरगाव भाजपा तर दराटी मनसेच्या ताब्यात आहेत. हे सर्व राजकीय समिकरण पाच वर्षांपूर्वीचे आहे. आज मात्र परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष व त्यांच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून उमरखेड तालुक्यातील ढाणकी, मुळावा, पोफाळी, दराटी, निंगणूर, विडूळ या जिल्हा परिषद सर्कलमधील अनेक गावांमध्ये काँग्रेसने आपली बाजू भक्कम करण्यासाठी दौरे सुरू केले आहेत. माजी आमदार अ‍ॅड़ अनंत देवसरकर व विजय खडसे सोबतच तातू देशमुख, राम देवसरकर, दत्तराव शिंदे, रमेश चव्हाण आदी मोठे नेते बैठका घेत आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहे. पाच वर्षांपूर्वी मिळालेले यश आजही राखून ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री व आमदार मनोहरराव नाईक यांनी उमरखेड तालुक्याच्या सर्व भागात दौरा केला. यामध्ये निवडणुकीची मोर्चे बांधणी करण्यासाठी गुप्त बैठका घेतल्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उत्तमराव राठोड, भीमराव चंद्रवंशी, कल्याणराव माने, आशाताई देवसरकर, बालाजी वानखडे, ख्वॉजाभाई, बळवंतराव चव्हाण, उत्तमराव जाधव, बालाजी डाखोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. भाजपा आमदार राजेंद्र नजरधने यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत अध्यक्ष व सात नगरसेवक निवडून आणून भाजपाची सत्ता स्थापन केली आहे. आता त्यांच्यासमोर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आव्हान आहे. हे आव्हान यशस्वीरित्या सांभाळण्यासाठी उत्तमराव इंगळे, सतीश वानखेडे, अ‍ॅड़ माधवराव माने यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभत आहे. परंतु भाजपामध्ये विविध प्रकारची नाराजी आहे, त्याचाही सामना करावा लागणार आहे. सेनेची मोठी जाबाबदारी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्यावर असून, त्यांनी उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसैनिकांसोबत अनेक बैठका घेणे सुरू केले आहे. संभाव्य उमेदवार प्रत्येक मतदारसंघात फिरताना दिसत आहे. सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीत चांगली कसरत करावी लागणार आहे. त्यावरच त्या पक्षाचे भवितव्य ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी) संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अनेक प्रमुख पक्षांनी नगर परिषद निवडणुकीत सपाटून मार खाल्ला. तर काहींना जेमतेम यश मिळाले. या सर्वांनी आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीकडे संधी म्हणून पहायचे ठरविले आहे. त्यामुळे ही संधी कोणत्याही परिस्थितीत दडविल्या जाऊ नये, यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहे. पक्षातील मोठे नेते यावेळी कोणतीही चूक करण्याच्या मनस्थितीत नाहीत. म्हणूनच योग्य रणनिती आखून प्रचार, प्रत्यक्ष भेटी-गाठी यावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येते.