लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : दरवर्षी गणेशोत्सव मंडळे मागील वर्षीपेक्षा मूर्ती मोठी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मूर्त्या मोठ्या करण्यापेक्षा सर्वांनी आपली मने मोठी करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.येथील पोलीस ठाण्यात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गणेश मंडळ व शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आगामी पोळा, मोहरम, गणेशोत्सव आदी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. ठाणेदार सोनाजी आमले यांनी प्रास्ताविकातून आपसात आपुलकी, प्रेम, एकता कायम ठेवून सण-उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. शहराची शांतता कायम राहावी म्हणून सर्व गणेश मंडळांनी रितीनुसार मिरवणूक काढावी, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी जावेद पटेल, राजेंद्र चव्हाण, आतीक मौलाना, प्रमोद बनगिनवार, अरविंद मिश्रा, संजय खंडारे यांनी शहरातील अडचणी कथन केल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, तहसीलदार राजेश वझिरे यांनी सभेला मार्गदर्शन केले.मंचावर मुख्याधिकारी शेषराव टाले, वीज वितरणचे अभियंता राठोड, आगार व्यवस्थापक प्रताप राठोड उपस्थित होते. संचालन आमीन चव्हाण तर आभार पीएसआय सुरेश कनाके यांनी मानले. यशस्वीतेसाठी पुंडलिक वानखडे, बापुराव दोडके, निळकंठ चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी, युवक, व्यापारी आदींनी सहकार्य केले.
मूर्त्यांपेक्षा सर्वांनी आपली मने मोठी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 9:55 PM
पोलीस ठाण्यात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गणेश मंडळ व शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आगामी पोळा, मोहरम, गणेशोत्सव आदी सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.
ठळक मुद्देएम. राज कुमार : दिग्रस येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक