लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने राज्यातील ४८ मतदारसंघात संघटन मजबूत केले आहे. याचा फायदा मित्र पक्षालाही होणार आहे. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षासोबतची युती अटळ आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी रविवारी सायंकाळी येथे झालेल्या पत्रपरिषदेत दिली.भाजपा मागील चार वर्षात केलेल्या विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढविणार आहे. वेगळ््या विदर्भ राज्याच्या मागणीचे भाजपाने नेहमीच समर्थन केले आहे. मात्र निवडणुका डोळ््यासमोर ठेवून विभाजन करता येणार नसल्याचेही खासदार रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले. २०१४ च्या लोकसभेत भाजपाचा विजय हा लाटेमुळे झाल्याचा खुलासा पराभूत काँग्रेसने केला होता. विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत या सर्वच निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली.राज्यातील ८१ नगरपरिषद, १५ महानगरपालिका, १२ जिल्हा परिषद आणि पाच हजार ग्रामपंचायतीचे सरपंच भाजपाचे आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी ९२ हजार बुथपैकी ८८ हजार बुथवर भाजपा पोहोचली आहे. येथे वन बुथ २५ युथ संकल्पना राबविली जात आहे. प्रत्येक बुथवर किमान १२ कुटुंब जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी यांचे मतदान सकाळी १० पर्यंतच करून घेण्याच्याही सूचना आहेत. याचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत असल्याचे खासदार दानवे यांनी याप्रसंगी सांगितले. पक्ष संघटना मजबूत केल्या तरच निवडणूक जिंकता येते. नशिबावर निवडणूक जिंकण्याचे दिवस गेल्याचेही दानवे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारांपुढे विविध विषय मांडले.पत्रपरिषदेला भाजपाचे राज्य सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी मंत्री संजय देशमुख यावेळी उपस्थित होते.प्रेमासाईला ओळखत नाहीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रेमासाई यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. यावर रावसाहेब दानवे म्हणाले, देशात एकही उमेदवारी निश्चित नाही. राज्य आणि केंद्रातील पार्लमेंट्री बोर्डाकडूनच उमेदवारी निश्चित केली जाते. प्रेमासाई ही कोण व्यक्ती आहे, तिला मी ओळखत नसल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.
मतविभाजन टाळण्यासाठी युती अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:25 PM
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने राज्यातील ४८ मतदारसंघात संघटन मजबूत केले आहे. याचा फायदा मित्र पक्षालाही होणार आहे. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षासोबतची युती अटळ आहे, ......
ठळक मुद्देरावसाहेब दानवे : भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचा मित्र पक्षालाही फायदा