अभाविप संपूर्ण विदर्भात २५ जूनपर्यंत ‘आम्ही ग्रामरक्षक’ अभियान राबविणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील ‘अभाविप’चे कार्यकर्ते थर्मल स्क्रीनिंग, निर्जंतुकीकरण, कोरोना लसीकरण जनजागृती करणार आहेत. हे अभियान पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी तालुक्यांमधील १८ गावांतील दोन हजार परिवार व पाच हजार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. यात ४० कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून अतिदुर्गम ग्रामीण भागात कोरोना लसीकरणासंदर्भात लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर होईल. ‘देश हमें देता है सबकुछ, हम भी तो कुछ देना सिखें’ या भावनेने ‘अभाविप’च्या या महाअभियानात समाजातील युवक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ प्रांत सहमंत्री अक्षय फुलारी, पुसद जिल्हा संयोजक धीरज शिंदे, उमरखेड नगरमंत्री सौरभ श्रीवास्तव, पुसद नगरमंत्री आदिराज सोळंके, आदींनी केले आहे.