लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील अमोलकचंद महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अजय लाड यांना ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागाचा बहुमान मिळाला आहे. सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या विषयावरील ही परिषद ३० मे ते १ जून या कालावधीत होत आहे.समारा विद्यापीठ रशिया आणि स्टामी नागपूरतर्फे ही परिषद घेण्यात येत आहे. यासाठी डॉ. लाड यांना रिसोर्स पर्सन म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांना संशोधनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी यंग सार्इंटिस्ट आणि बेस्ट संशोधक पुरस्कार मलेशिया येथे मिळाला आहे. विविध विषयाच्या संशोधनात्मक बाबींवर त्यांचे आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहे. या बहुमानाबद्दल त्यांचे विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा, सचिव प्रकाश चोपडा, प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा, अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगीरवार आदींनी कौतुक केले.
अमोलकचंदचे अजय लाड आंतरराष्ट्रीय परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 9:40 PM