लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षी अल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे तालुक्यातील आनंदवाडी येथील महिलांना तब्बल दीड किलोमीटरचा प्रवास करून पाणी आणावे लागत आहे. सरपंच, सचिवाच्या दुर्लक्षित धोरणामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीिट करावी लागत असल्याने गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.आनंदवाङी येथे १०० टक्के पारधी बांधवांची वस्ती आहे. मात्र या गावाकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे सध्या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आनंदवाङीच्या महिलांना गावाबहेरून दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. गावात नळयोजनेव्दारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. मात्र गेल्या ८ दिवसांपासून नळयोजनेच्या विहिरीवरील ङीपी जळाल्यामुळे गावात पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. त्यामुळे गावालगतच्या दीड किलोमीटर अंतरावरील शेतातून महिलांना पाणी आणावे लागत आहे.काही दिवसांपूर्वी महसूल राज्यमंत्री संजय राठोङ यांनी पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी पाणीटंचाईबाबत हयगय ऐकली जाणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा इशाराही गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आता आनंदवाडीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आनंदवाडीच्या महिलांची पाण्यासाठी फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:18 PM
यावर्षी अल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे तालुक्यातील आनंदवाडी येथील महिलांना तब्बल दीड किलोमीटरचा प्रवास करून पाणी आणावे लागत आहे. सरपंच, सचिवाच्या दुर्लक्षित धोरणामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीिट करावी लागत असल्याने गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देदीड किलोमीटरची पायपीट : सरपंच, सचिवांच्या दुर्लक्षामुळे संताप