शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

रस्ता रुंदीकरण करताना सापडला खजिना; यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 1:12 PM

Yawatmal News यवतमाळ झरी तालुक्यातील शिबला ते पांढरकवडा या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणात प्राचीन काळातील दगडी खांब आढळून आले.

ठळक मुद्देपांढरकवडा- शिबला रस्ता रुंदीकरण करताना आढळले प्राचीन दगडी खांब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : झरी तालुक्यातील शिबला ते पांढरकवडा या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तालुक्यातील पार्डी गावाजवळील वळण रस्त्यावर खोदकाम करीत असताना प्राचीन काळातील दगडी खांब आढळून आले. यावरून याठिकाणी पुरातन काळात एखादे साम्राज्य असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

झरी तालुक्यात अनेक रहस्यमय बाबी आहेत. हा भाग मागासलेला असला तरी तालुक्यात आजही अनेक रहस्यमय बाबी आहेत. तालुक्यातील खापरी शेखापूर जंगलातही वेगवेगळ्या आकारांचे दगड आढळून आले आहेत. पूर्वी तेथे गाव असल्याच्या खुणा आढळतात. या दगडी खांबांमुळे पुरातत्व विभागाला संशोधनाची संधी प्राप्त झाली आहे. कायर भागातही खोदकामात अनेक प्राचीन अवशेष सापडले असून कायर, जुनी मांगली, भुडकेश्वर येथे प्राचीन मंदिरे आहेत. ही मंदिरे त्या काळच्या राजाने निर्माण केलेली आहेत.

काळाच्या ओघात अनेक उलथापालथी होऊन वास्तू दडल्या जातात. मात्र, काही पुरावे सोडून जातात. माथार्जुन येथेही फार पूर्वी सती प्रथा होती, असे काही ज्येष्ठ नागरिक सांगतात. सतीच्या समाधीचे काही दगड याठिकाणी आहेत. या भागाकडे दुर्लक्ष झाले असले तरी मानवी इतिहास हा फार जुना आहे. भूकंप, नैसर्गिक संकटे यात अनेक प्राचीन वैभव नाहीसे झालेले आहे. या दगडामुळे इतिहासकारांना संशोधनासाठी एक नवा विषय मिळाला आहे. दरम्यान, रस्त्यावर पुरातन काळातील असे दगडी खांब आढळून आल्याने परिसरात मात्र हा कुतूहलाचा विषय बनला आहे.

 

टॅग्स :historyइतिहास