शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

वºहाडी बोली कविसंमेलन : हसता-हसता केले रसिकांना अंतर्मुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 9:38 PM

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : पिलू ठेवून खोप्यात चिऊ हिंडते चाऱ्याले गोठ्यामंदे काळी ...

ठळक मुद्देमाय असावी साऱ्याले

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :पिलू ठेवून खोप्यातचिऊ हिंडते चाऱ्यालेगोठ्यामंदे काळी गायकशी चारे वासरालेहे पाहून वाटतेमाय असावी साऱ्यालेकवी जयंत चावरे यांनी सादर केलेली ‘माय’ कविता वऱ्हाडी बोली कविसंमेलनात सर्वाधिक भाव खाऊन गेली. चावरे यांनी आपल्या स्वरात ही कविता सादर केली. या कवितेने अनेकांच्या डोळ्यांना धारा लागल्या. माय म्हणजे काय, मायचे महती जयंत चावरे यांनी वऱ्हाडी बोलीतून मांडली.शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर, प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर शनिवारी सायंकाळी वऱ्हाडी बोली कविसंमेलन झाले. यावेळी नवोदित आणि गाजलेल्या कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. शेतकरी, गावाकडच्या जुन्या परंपरा, आई, देश, कपाशी, भाऊबंदकी, कष्टकरी आणि वैदर्भीय माणूस यासारख्या अनेक विषयांना कवितेतून हात घातला.तुह्यं तू पाय मी माह्यावालं पायतो,आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतो,रोज कोरू कोरू लेका लंबा केला धुरा,बोलत नाही म्हणून फायदा घेतं पुरा,जेवढी हाय जमीन तेव्हडी इमानदारीनं वायतो,आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतोभाऊबंदकीचा व्यवहार सांगणारी ही कविता आठमुर्डीतील नीलेश तुरके या नवोदित कवीने सादर करताच हास्यकल्लोळ उडाला.गेले जमाने आंबे, चिचाचेबोरीच्या खाली बोरं वेचाचेकवा हुरडा तोंडाले पाणीभोंग्याले वाजे लग्नाचं गाणंमांडवासाठी भोकराचे पानंशेनाच गोंदन पुरनाची पोळीया नितीन देशमुखांच्या कवितेने ग्रामीण भागातील जीवन कसे बदलत चालले आहे याचे वर्णन केले. अनेकांना पूर्वीच्या काळातील इतिहासात नेण्याचे काम या कवितेने केले. ‘वान्नेरतोंडे’ या राजा धर्माधिकारी यांच्या कवितेने पाकिस्तानला उघडे पाडण्याचे काम केले.काय कामाच्या पार्ट्या,काय कामाचे पक्षदेश पेटला तरीखुर्च्याकडेच लक्षकुनी दाखवते नेहरूकुनी दाखवते गांधी,दाखवते केसर आणिहाती देते गेरूया कवितेमधून पाकिस्तानी कारवाया आणि त्याचा उद्रेक मांडण्याचा प्रयत्न केला. या कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला. पुसदचे दीपक आसेगावकर यांनी कापूस आणि सरकीच्या रूपात बहरणारे अजरामर प्रेम ही कविता सादर केली.यावेळी सुरेश गांजरे, राजा धर्माधिकारी, आशा आसुटकर, रमेश घोडे, विष्णू सोळंके, अलका तालणकर, सुनिता पखाले, बसवेश्वर माहूलकर, राजेश देवाळकर, विजय ढाले, डॉ. मार्तंड खुपसे, आंबादास घुले, ऋतू खापर्डे, डॉ. गिरीष खारकर यांच्याही कविता गाजल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. शांतरक्षित गावंडे आणि डॉ. स्वप्नील मानकर यांनी केले.मिर्झांच्या कवितेने हास्यकल्लोळमिर्झा रफी अहेमद बेग यांनी सादर केलेल्या कवितेने माहोल केला. ‘शेतकऱ्यांनो आता घेवू नका फाशी’ ही कविता त्यांनी सादर केली. ‘शेतकऱ्यांवर प्रसंग फुटाने फाकाचे, अमीताब घालतो ३ लाखाचा गॉगल’ अशी गमतीदार रचना सादर करून त्यांनी अनेकांना विचार करण्यास भाग पाडले. याचवेळी माय मराठीचे गुणगान सांगणारी कविताही सादर केली. तर मिरा ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय कवितेमध्ये ‘असा वऱ्हाडी माणूस, कुदळ पावडे त्याचा साज’ ही भारदस्त कविता सादर केली.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन