समता पर्व : कविसंमेलनात सम्यक क्रांतीचा जयघोष, सामाजिक समरसतेवरच्या काव्यफुलांची मेजवानीयवतमाळ : ‘मी सुखाला आज येथे दान केलेहे दु:खाचे केवढे सन्मान केले...चंद्र शोधाया निघालो भाकरीचाअन् भुकेला पिंपळाचे पान केले..माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांचा आवश्यकता असते. त्याहीपेक्षा समाज जगविण्यासाठी महत्वाची असते विचार भूक. व्यवस्थेने लादलेल्या भांडवली धोरणाने सामाजिक विषमतेचे अंतर वाढत असले तरी चळवळ जगविण्यासाठी आंबेडकरवादी विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. येथील समता पर्वात सम्यक क्रांतीचा जयघोष विविध कवींनी आपल्या कविता सादर केल्या. गजलकार विनोद बुरबुरे, किरण मडावी यांनी कविसंमेलनाला एक वैचारिक उंची प्राप्त करून दिली. राष्ट्रीय वास्तव उजागर करणारे सत्या यावेळी अधोरेखीत करण्यात आले. वाटणी झाली अशी माझ्या घराचीमाय काश्मीर, बाप भारत मी कराचीवावटळ भगवी पुन्हा जोमात आलीठेव मित्रा तू तयारी संगराची...विषमतेला खतपाणी घालणाऱ्या अराजक वृत्तींचा संचार लोकशाही मूल्यावर घाला घालीत आहे. अशा वेळी लढणे हाच एक पर्याय आपल्याजवळ शिल्लक आहे. एका देशात सुखाने नांदणाऱ्यांना धर्म, पंथ, जातीच्या आणि प्रांताच्या नावावर वाटणी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा कवींनी दिला. प्रा. शांतरक्षित गावंडे यांनी आपली गजल सदृश रचना सादर केली. प्रत्येक माणसाचा आम्हास गर्व आहेया रे या बहुजनांनो समतेचे पर्व आहेसमजा समाज निर्मितीसाठी समता पर्वात स्वाभिमानाने सहभागी होण्याची हाक दिली. हाच धागा पकडून डॉ. शीतल मडावी यांनी स्त्रीमुक्तीचा सन्मान केवळ संविधानात असून, शनी प्रदूषणाचे स्तोम वेठीस धरल्याचे सांगितले. समतेचा तुझा संदेश संविधनातला दुमदुमला आसमंत चक्क जेव्हा शनी प्रदूषणातही तूच देऊ शकतो स्त्रियांना हक्कप्रमोद कांबळे यांनी ‘आम्हा उन्हातले तुच झाड होता, आम्ही तहानलेले तूच महाड होता’, या काव्यपंक्ती सादर केल्या. संमेलनाचे अध्यक्ष हेमंत कांबळे यांनी ‘आता आपणच निर्धाराचा पहाड होऊ, गावच्या गावपणासाठी संघर्षाचा महाड होऊ’ या काव्यपंक्ती सादर केल्या. कविसंमेलनात प्रकाश खरतडे, इंदूताई मोहुर्लेकर, सुनंदा मडावी, पुष्पा नागपुरे, मनीषा तिरणकर यांनी कविता प्रस्तुत केल्या. कविसंमेलनाला उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखेडे, किशोर भगत, दीपक नगराळे, अंकुश वाकडे, दिनेश कांबळे, संतोष डोमाळे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
...अन् भुकेला पिंपळाचे पान केले
By admin | Published: April 16, 2016 1:52 AM