लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बेमुदत संप पुकारल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी मोर्चेकरी महिलांनी राज्य शासनाविरोधात निदर्शने केली.मानधन वाढीच्या मागणीसाठी अंगणवाडीसेविकांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. जून ते आॅगस्टचे मानधन तत्काळ देण्यात यावे, एक वर्षांपासून प्रलंबित भत्ता देण्यात यावा, सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाºयांना एकरकमी लाभ देण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेकडे देण्यात आले. प्रश्न तत्काळ निकाली काढावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे, जिल्हा सचिव संजय भालेराव, उषाताई डंभारे, रचना जाधव, गुलाबराव उम्रतकर आंदोलनात सहभागी झाले होते.
अंगणवाडीतार्इंची जिल्हा परिषदेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:20 AM
जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बेमुदत संप पुकारल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने शनिवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली.
ठळक मुद्देजिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बेमुदत संप पुकारल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही.