ठळक मुद्देअवैध दारु विक्री होत असल्याने संताप
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानटपरीतून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानटपरी पेटवून दिली. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. अवैध दारूविक्रेत्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोचला आहे.