लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील डॉ. अंजली राऊत यांना डॉ.मालती अॅलेन चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. सरकार अॅलेन महात्मा हॅननिमय अॅण्ड स्वामीजी ट्रस्ट कलकत्तातर्फे डॉ. मालती अॅलेन नोबेल अवार्ड-२०१८ ने सन्मानित करण्यात आले.होमिओपॅथीमध्ये बीएचएमएस पदवी शिक्षण घेणाऱ्या भारत आणि बांग्लादेशमधील प्रथम शंभर विद्यार्थ्यांना डॉ. मालती सरकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारसाठी महाराष्टÑातील १६ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यामध्ये विदर्भातून एकमेव डॉ.अंजली राऊत यांचा समावेश आहे. त्या अमरावती येथील तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथी मेडिकल कॉलेच्या पदवी प्राप्त विद्यार्थिनी आहे. त्यांचा कलकत्ता येथील ट्रस्टचे डॉ. जी.पी. सरकार, स्वामी सुवारनंद महाराज, केंद्रीय आरोग्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. रामजी सिंह, बांग्लादेशचे उपउच्चायुक्त तोफीक हसन यांच्या हस्ते १० हजाराचा धनादेश, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
अंजली राऊत यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:02 PM