लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सांगून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. सोबतच महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.लग्नाचा ठोक असल्याने बसस्थानकावर गर्दी असताना फलाट मात्र रिकामे दिसतात. एखादी बस लागताच लोंढेच्या लोंढे त्या दिशेने धावतात. जागा पकडण्यासाठी रेटारेटी सुरू होते. कुठल्याही मार्गावरील बसची हिच स्थिती आहे. तरीही अतिरिक्त तर दूर नियमित फेºयाही कमी धावत आहे. आगारात अनेक बसेस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत उभ्या राहतात. बसेस असल्या तरी चालक-वाहक नाही म्हणून तर कधी तिकीट मशीनचा तुटवडा सांगून फेऱ्या रद्द केल्या जातात. चालक-वाहकांना आस्थापना विभागात कामगिरी दिली जाते. काही ठिकाणी तर अनावश्यक मनुष्यबळ वापरले जात असल्याची ओरड कामगारांमध्ये आहे. एका व्यक्तीवर भागणारे काम दोघांना सोपविले जाते. उत्पन्न बुडत असताना अशा कामगारांना बसवर कामगिरी का दिली जात नाही, हा प्रश्न आहे. काही कामगारांवर असलेली वरिष्ठांची मर्जी इतरांची मानसिकता खराब ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. याच कारणातून चालक-वाहक कामगिरी टाळत असल्याचे सांगितले जाते. जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ आगारातूनच याची सुरुवात होते. इतर आगारांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. टाइमपास प्रकारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. याला नियंत्रणात आणण्याची आवश्यकता आहे.अतिकालिक भत्त्यावर उधळपट्टीकमी बेसिकच्या कामगारांना अतिकालिक भत्त्याची कामगिरी देण्याचे महामंडळाचे निर्देश आहे. मात्र यवतमाळ विभागात याउलट सुरू आहे. ३०० ते ३१५ रुपये तास एवढा ओटी घेणाऱ्या कामगारांना अतिरिक्त कामगिरी दिली जात आहे. ९० ते २०० रुपये ओटीच्या कामगारांना मागूनही काम दिले जात नाही. काही कामगारांचा ओटी तर त्यांच्या मासिक वेतनापेक्षाही अधिक जातो, हे वास्तव आहे. यवतमाळ आगारात असलेल्या ८५ पैकी ६० ते ६५ बसेसच उपयोगात येतात. राहिलेल्या बसेस विविध कारणांमुळे आगाराची राखण करतात.
ऐन हंगामात बसफेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 9:37 PM
गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सांगून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.
ठळक मुद्दे‘एसटी’चे नुकसान : प्रवाशांचे हाल, कारणांची यादी, गाड्या दुरुस्तीला विलंब