लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रासेयोचे प्र. संचालक डॉ. राजेश बुरंगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.माँ सरस्वती, संत गाडगेबाबा, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी जेडीआयईटीच्या नवीन रासेयो कार्यालयाचे उद्घाटन डॉ. राजेश बुरंगे यांनी केले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.जेडीआयईटीच्या रासेयो विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड यांनी प्रास्ताविक केले. संचालन धनंजय तुळसकर, पूजा चौधरी, अश्विनी भिमटे यांनी केले. आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार यांनी मानले. यावेळी प्रा. नितीन चव्हाण, प्रा. विद्याशेखर, प्रा. मयूर जिरापुरे, प्रा. नवनाथ खर्चे, प्रा. सागर जिरापुरे, विद्यार्थी प्रतिनिधी सोमन गटलेवार आदी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी मयूर मांडवकर, राम जाधव, नदीम फकीर, शाकीब शेख, खालीद अन्सारी, रोशन जयस्वाल, वैभव बोबडे, प्राची कापूसकर, दिव्या शेंद्रे आदींनी पुढाकार घेतला.
‘जेडीआयईटी’मध्ये रासेयो वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 6:00 AM