ठळक मुद्देबाधित उपचार घेणाऱ्यांची संख्या झाली ६१
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या आणखी ११ जणांचे रिपोर्ट्स पॉझेटिव्ह आले आहे. रविवारी रात्री ५ तर सोमवारी सकाळी ६ असे एकूण ११ जणांचे पॉझेटिव्ह अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. त्यामुळे आयसोलेशन वार्डमध्ये दाखल एकूण एक्टिव पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता ६१ झाली आहे. हे सर्व जण पॉझेटिव्ह रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टेक्ट मधील असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आह.े