शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

भूखंड माफियांवर आणखी एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:21 PM

लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक : २५ हजार चौरस फूट भूखंड हडपला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.गजानन नरहरी धोंडगे रा. मेहकर जि. बुलडाणा यांनी लोहारा पोलीस ठाण्यात २१ जुलै रोजी फिर्याद नोंदविली. त्यावरून भूमाफिया राकेश दीपक यादव रा. पवारपुरा, भोसा रोड यवतमाळ, त्याचे साथीदार नीलेश लहुराव बनोरे रा. जामनकरनगर उमरसरा यवतमाळ व नीलेश वलजीभाई उनडकर रा. हनुमान आखाडा चौक यवतमाळ या तिघांविरुद्ध भादंवि ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७१, ४७४, १२० (ब) भादंवि व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्य आरोपी राकेश यादव अद्याप पसार असून त्याच्या दोन्ही साथीदारांना पोलिसांनी रात्रीच अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून भूमाफियांच्या एकूणच कारनाम्यांचा, त्यात सहभागी पडद्यामागील चेहऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहे. राकेश यादव व त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध नुकताच यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातही अशाच स्वरूपाचा फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा नोंदविला गेला आहे. त्यात आतापर्यंत एकच आरोपी अटक असून इतरांचा शोध सुरू आहे.गजानन धोंडगे यांचा लोहारा-वाघापूर बायपासवर २५ हजार चौरस फुटाचा भूखंड आहे. हा भूखंड राकेश यादव व टोळीने बनावट मालक उभा करुन परस्पर त्याची खरेदी करुन घेतली. त्यासाठी बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य कागदपत्रांचा वापर केला गेला. गैरमार्गाने खरेदी करून घेतलेल्या या एकाच भूखंडावर दोन बँकांमधून एकूण सात कोटी रुपयांचे कर्ज उचलले गेले. प्रत्यक्षात या भूखंडाची किंमत अडीच ते तीन कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.भूखंड घोटाळ्याची चौकशी एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत सुरू आहे. या चौकशीत आणखी किती तरी प्रकरणे पुढे येण्याची शक्यता एसआयटीचे प्रमुख यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली आहे.भूखंडधारकांची तलाठ्यांकडे गर्दी‘लोकमत’ने यवतमाळातील भूखंड घोटाळा उघडकीस आणल्यानंतर एका पाठोपाठ फसवणुकीची प्रकरणे उघड होत असून त्यात गुन्हेही नोंदविले जात आहे. भूखंड हडपण्याचे प्रकार पाहता कित्येक भूखंड मालकांनी आपली स्थावर मालमत्ता सुरक्षित आहे की नाही, ती खरोखरच आपल्या नावावर आहे का की परस्परच कुणी त्याची विल्हेवाट लावली, याची खातरजमा करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी संबंधित तलाठी कार्यालय गाठून सातबारा मिळविला जात आहे. याशिवाय फेरफार नोंदी तपासून दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयातूनही खातरजमा करून घेतली जात आहे. या तपासणीत आणखी काही मोठी प्रकरणे उघडकीस येणार असल्याची माहिती आहे.पुन्हा दोन गुन्हे प्रक्रियेतभूमाफियांचे अनेक कारनामे दरदिवशी एसआयटीपुढे येत आहेत. त्यातूनच या माफियांविरोधात आणखी दोन गुन्हे प्रक्रियेत आहेत. केवळ संबंधित आवश्यक कागदपत्रे फिर्यादीकडून प्राप्त होण्याची पोलिसांना तेवढी प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा