लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: उमरखेड़ येथे मुंबईवरून आलेली महिला पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ असून सुरवातीपासुन आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १२४ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहे. यापैकी ९९ जण बरे होऊन घरीसुद्धा गेले आहेत.नव्याने पॉझिटिव्ह आलेली ही महिला संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती होती, मात्र रात्री तिला वैद्यकिय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. तिच्या परिवारातील १९ लोकसुद्धा संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती होते, मात्र आता त्यांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.मुंबई, पुणे किंवा इतर रेड झोनमधून जिल्ह्यात आलेल्या लोकांनी पुढील १४ दिवस स्थानिक लोकांच्या संपर्कात येऊ नये. त्यांनी स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी अत्यंत जबाबदारीने आणि सक्तीने गृह विलागिकरणातच राहावे. सर्व नागरिकांनी आपल्या घरातील ६५ वर्षाच्या वरील व्यक्ति आणि १० वर्षाखालील मुलांची काळजी घ्यावी.सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत जिल्ह्यात कुठेही फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या सूचनांचे सर्वांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.
Corona Virus; मुंबईवरून यवतमाळात आलेली आणखी एक महिला पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:18 AM