लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : अंजी(नृ) येथील भोयर नर्सिंग कॉलेजमध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. यात १८ जोडपी विवाहबद्ध झाली.या मेळाव्याचे आयोजन बळीराजा चेतना अभियानांतर्गत प्रियदर्शिनी सामाजिक बहुद्देशीय संस्था मोवाडातर्फे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सतीश भोयर होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ राठोड, माणिक मेश्राम, सुनील देठे, गजानन भोयर, नागोराव लेणगुरे, पांडुरंग किरणापुरे, गणेश साबापुरे, श्रीराम तोडसाम, दीपक मेश्राम, भाऊ चांदेकर, प्रवीण कारिया, संजय राऊत, श्रीराम कदम, तुकाराम नारायणे, सतीश पडगीलवार, हरिभाऊ निकम, सुधीर बुर्रेवार आदी उपस्थित होते.प्रसंगी सतीश भोयर, गणेश साबापुरे, माणिकदास टोंगे आदींनी विचार मांडले.प्रास्ताविक संस्था प्रमुख अमोल बाहेकर, संचालन गजेंद्र ढवळे यांनी केले. आभार माणिकदास टोंगे यांनी मानले. मेळाव्यासाठी अभिषेक ठाकरे, गजानन भोयर, सुनील देठे, संतोष कहाळे, सुरेश कुडेगावे, तुषार दावडा, मनोज द्रोणा, धनंजय मनसुख गंढेचा यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी जगदीश बाहेकर, विशाल किनाके, संतोष सुरपाम, देवीदास मेश्राम, राजू खंडाळकर, रामराव तोडसाम, प्रियंका मेश्राम, तेजल मानकर, रसिका खोब्रागडे, दिलीप चंद्रमे, रवी मेश्राम, दत्ता हलालवार, रवी ढवळे, राम चौरागडे, रवी चव्हाण आदींनी पुढाकार घेतला.
अंजी येथे १८ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:40 PM
अंजी(नृ) येथील भोयर नर्सिंग कॉलेजमध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. यात १८ जोडपी विवाहबद्ध झाली. या मेळाव्याचे आयोजन बळीराजा चेतना अभियानांतर्गत प्रियदर्शिनी सामाजिक बहुद्देशीय संस्था मोवाडातर्फे करण्यात आले होते.
ठळक मुद्देभोयर नर्सिंग कॉलेजमध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा