शेतकऱ्यांना सातबारावर पिकाची अचूक माहिती भरण्यासाठी राज्य सरकारने या वर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल आणि कृषी विभागातर्फे संयुक्तपणे हा उपक्रम राबविला जात आहे. माझी शेती माझा सातबारा, माझा पिक पेरा यासाठी शासनाच्या वतीने १५ ऑगस्टपासून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना सातबारावर पिकाची अचूक माहिती भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असून यासाठी आता तीनच दिवस उरले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ई-पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनासुद्धा ई-पीक पाहणी नोंदविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. उपविभागीय महसूल अधिकारी विवेक जॉन्सन, तहसीलदार सुरेश कव्हळे, नायब तहसीलदार रामदास बीजे, तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार आणि त्यांच्या अधिनस्त असणारी संपूर्ण यंत्रणा दैनंदिन विविध शेतातील बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:41 AM