लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंचची सभा येथे घेण्यात आली. यामध्ये वार्षिक आढावा घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य निरीक्षक म्हणून अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश वाघ होते. प्रसंगी मंचचे जिल्हाध्यक्ष म्हणून शशीकांत लोळगे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सतीश बजाईत, देवेंद्र खैरे, अविनाश देशमुख, छत्रपती फाटे, निवृत्ती शेळके, संजय मुंदाने, अविनाश कलोडे आदी उपस्थित होते. जिल्हा व तालुका कार्यकारिणीने केलेल्या कामांचा वार्षिक आढावा घेण्यात आला. सेवानिवृत्त एकल केंद्र प्रमुख मेसेवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत शेळके, तपके, विजय वाघ आणि उपक्रमशील शिक्षिका कुंजना गोंडाने यांचा सत्कार करण्यात आला.लोकशाही पद्धतीने सर्वानुमते तीन वर्षांसाठी शशीकांत लोळगे यांची जिल्हाध्यक्षपदी, तर महिला प्रमुखपदी सविता उईके, जिल्हा सरचिटणीस विनोद खरूलकर, कार्याध्यक्ष अभिजित नवलकर यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर खुडे, महिला उपप्रमुख कुंजना गोंडाने, तर राज्य प्रतिनिधी म्हणून प्रभाकर खोडे यांची निवड झाली.प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले. जिल्हाध्यक्ष लोळगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद कांबळे यांनी बदलीविषयक मार्गदर्शन केले. संचालन प्रसिद्धी प्रमुख मोरेश्वर पुंडशास्त्री यांनी, तर आभार सविता उईके यांनी मानले. सभेसाठी विनोद खरूलकर, नीलेश कचरे, अभिजित नवलकर, मधुकर मोरझडे आदींनी पुढाकार घेतला.शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल, असे या सभेमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
एकल शिक्षक सेवा मंचचे जिल्हा पदाधिकारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:10 PM
महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंचची सभा येथे घेण्यात आली. यामध्ये वार्षिक आढावा घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य निरीक्षक म्हणून अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश वाघ होते. प्रसंगी मंचचे जिल्हाध्यक्ष म्हणून शशीकांत लोळगे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
ठळक मुद्देअध्यक्ष लोळगे : शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा