लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू केली आहे. तथापि कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक प्रवासाकरिता धजावत नाही. अनेक बसफेऱ्या नेमके प्रवासी घेऊन मार्गावर धावत आहे. तरीही महामंडळाच्या स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ड्यूटीवर बोलाविणे, ताटकळत ठेवणे आदी प्रकार घडत आहे. याला महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी चाप लावला आहे. कामांचे नियोजन करा, गरज असेल तरच कर्मचाऱ्यांना बोलवा अशा कडक सूचना त्यांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.बसस्थानकावरून नेमक्या बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. सर्वच आगाराची ही परिस्थिती आहे. तरीही कर्मचाऱ्यांची गर्दी वाढविण्याचा प्रकार स्थानिक अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. काही वेळातर संचारबंदी काळात अर्थात पहाटे ६.३० वाजता कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली होती. अलीकडे हजेरी देण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलाविले जात आहे. हा सर्व प्रकार लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम तोडणारा आहे. प्रामुख्याने चालक आणि वाहकांना या प्रकारात मानसिक त्रास सहन करावा लागतो. कामगिरी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागते. ‘लॉकडाऊनमुळे जिल्ह्यांतर्गत मार्गावरील वाहतूक सुरू आहे तरीही सर्व चालक-वाहकांची कामगिरी लावली जाते. त्यांना हजर राहण्यास सांगितले जाते. प्रत्यक्षात लावण्यात आलेल्या कामगिरीपैकी सर्व कामगिरी चालविली जात नाही. या सर्व बाबी ‘लोकमत’ने पुढे आणल्या होत्या.दुसºया दिवशी करावयाच्या वाहतुकीचे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणातच चालक-वाहकांची कामगिरी लावा’, अशा शब्दात महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रक आणि सर्व संबंधितांना बजावले आहे.रोजंदारी कामगारांना कामगिरी द्यामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नव्यानेच रुजू झालेल्या कामगारांना आठवड्यातून किमान एक कामगिरी द्या, त्या पद्धतीने नियोजन करा, असे बजावले आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ‘वाहकाकडे वाहतूक नियंत्रणाचे काम’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखलही वाहतूक महाव्यवस्थापकांनी घेतली आहे. वाहकांवर वाहतूक नियंत्रकाची जबाबदारी सोपवू नका, अशी सूचना करण्यात आली. तरीही यवतमाळ विभागात मनमानी सुरू आहे. ११ जून रोजी महाव्यवस्थापकांनी या सर्व सूचना परिपत्रकातून दिल्यानंतरही १२ जून रोजी काही ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण वाहकच करत होते.
एसटी अधिकाऱ्यांच्या मनमानीला बसला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 5:00 AM
बसस्थानकावरून नेमक्या बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. सर्वच आगाराची ही परिस्थिती आहे. तरीही कर्मचाऱ्यांची गर्दी वाढविण्याचा प्रकार स्थानिक अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. काही वेळातर संचारबंदी काळात अर्थात पहाटे ६.३० वाजता कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली होती. अलीकडे हजेरी देण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलाविले जात आहे. हा सर्व प्रकार लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम तोडणारा आहे.
ठळक मुद्देकामांचे नियोजन करा : गरज असेल तरच कर्मचाऱ्यांना बोलवा