मुख्याध्यापक प्रदीप चिरडे परिसरातील पालकांसोबत उद्धटपणे वागत असून, पालक-पाल्यांच्या नववी व दहावीच्या प्रवेशासाठी शाळेत आल्यास त्यांना पाचवी व आठवीच्या पाच टीसी आणा, तरच तुमच्या मुलाचे ॲडमिशन होईल, नाही तर तुम्हाला निर्धारित पैसे द्यावे लागतील, असा दम देण्यात येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे परिसरातील पालक मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झाले आहेत. शेजारील गावांतील गरिबांच्या मुला-मुलींचे शिक्षण सोयीचे व्हावे म्हणून या भागात शाळा सुरू करण्यात आली. मात्र, मुख्याध्यापक चिरडे पालकांना मानसिक व आर्थिक त्रास देत त्यांच्याशी उद्धट वर्तणूक करीत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. अन्यथा मुख्याध्यापकाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
कोट
आमच्याकडे आठवीच्या दोन तुकड्या असल्याने नववीत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या काही पालकांकडून आठवीच्या टीसीची मागणी केली; परंतु कोणालाही पैसे मागितले नाहीत. पालकांचे आरोप खोटे आहेत.
प्रदीप चिरडे, मुख्याध्यापक, वसंतराव नाईक विद्यालय, बोरी इजारा