शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

६० वन कर्मचाऱ्यांची फौज वाघांच्या मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:50 PM

१५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाºया वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाºयांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘एसटीपीएफ’ला पाचारण : मादी-पिलांना एकाच वेळी पकडण्याचा पहिलाच प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाऱ्या वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे. या मोहिमेत वाघाला घेरण्यासाठी चार हत्ती दाखल होण्याची वन खात्याला प्रतीक्षा आहे.पांढरकवडा वन विभागांतर्गत आतापर्यंत वाघाने १५ जणांची शिकार केली. बुधवारी हा १५ वा बळी घेतला. या शिकारीमुळे एकीकडे गावकऱ्यांमधून वाघाला पकडण्याची मागणी होत असताना वाघाकडून एका पाठोपाठ शिकारीही केल्या जात आहे. बुधवारच्या घटनेनंतर वाघ शोध मोहिमेला प्रचंड वेग आला आहे. पुसद, यवतमाळ येथील वाहने तसेच ६० पेक्षा अधिक वन अधिकारी-कर्मचाºयांची नियुक्ती वाघाच्या शोधार्थ करण्यात आली आहे. पेंच-नवेगावबांध व नागझिरा अभयारण्यातील स्पेशल टायगर्स प्रोटेक्शन फोर्सच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. एकाच वेळी मादी आणि तिच्या पिलांना पकडण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते.वाघाच्या या वाढत्या हैदोसाच्या पार्श्वभूमीवर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच सर्व संबंधितांची बैठक बोलविली होती. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक, वन विकास महामंडळाचे उच्च पदस्थ अधिकारी, पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक, राळेगावचे उपविभागीय महसूल अधिकारी आदी मंडळी या बैठकीला उपस्थित होती. त्यात आयएफएस के.अभर्णा यांनी वाघाला पकडण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या आहेत व त्याकरिता काय-काय व्यवस्था लागणार आहे, याचे प्रेझेन्टेशन या बैठकीत सादर केले. त्यात त्यांनी वाघाला घेरता यावे म्हणून चार हत्तींची मागणी नोंदविली. कारण ज्या भागात वाघ शिकारी करतो आहे ते ९५ टक्के क्षेत्र वन विकास महामंडळाचे आहेत. त्यातील काही भाग अतिशय दुर्गम असल्याने तेथे वाहन जाणे शक्य नाही. अशा वेळी हत्तीची मदत घेऊन वाघाला बेशुद्ध करता येऊ शकते. मात्र वन विकास महामंडळाकडून वाघ पकडण्याबाबत तेवढे ताकदीचे प्रयत्न होताना दिसत नाही.या वाघाला पकडण्यासाठी नागपूरच्या वन मुख्यालयातून वेगाने सूत्रे न हलविली गेल्यास वाघाकडून आणखी काहींची शिकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाघ पकडण्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे आधीच जारी करण्यात आली आहे. त्या तत्वानुसारच मोहीम राबवावी लागते. वाघ पकडण्यासंबंधी पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक के.अभर्णा यांनी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची बैठक घेऊन मोहिमेसंबंधी आवश्यक सूचना दिल्या असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.वाघाच्या बेशुद्धीचे तीन प्रयत्न फसलेयापूर्वी या वाघाला पकडण्यासाठी बेशुद्ध करण्याचे दोन ते तीन प्रयत्न झाले. तेव्हापासून सदर वाघीण मनुष्य दिसला की, चवताळून त्याच्यावर थेट झडप घालते. त्यामुळे एक्सपर्ट वन कर्मचारीही पुरेशा तयारी अभावी त्या वाघासमोर सहजासहजी व एकटे-दुकटे जाणे टाळत आहेत. वाघिणीचे तीनही पिले मोठे झाल्याने कदाचित तेसुद्धा शिकार करीत असावे, अशी शंका वन खात्याला आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे वाघाला जीवानिशी ठार मारता येत नाही. त्यामुळे त्याचा शोध घेणे, त्याला बेशुद्ध करणे व पकडून व्याघ्र प्रकल्पात नेऊन सोडण्याचे आव्हान पांढरकवडा वन विभागापुढे आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग