शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आर्णीत सोमवार ठरला ‘आंदोलन’वार

By admin | Published: March 22, 2016 2:33 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील विविध समस्यांसाठी नगरपरिषदेसमोर चक्क खड्डा खोदून समाधी आंदोलन केले,

आर्णी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील विविध समस्यांसाठी नगरपरिषदेसमोर चक्क खड्डा खोदून समाधी आंदोलन केले, तर पाणीटंचाईने त्रस्त सातारातील महिला घागर मोर्चा घेऊन येथील पंचायत समितीवर धडकल्या, तर नगरपरिषद क्षेत्रातील देऊरवाडा पुनर्वसन येथील नागरिक पाण्याची मागणी करत रस्त्यावर उतरले. नगरपरिषदेला कुलूप ठोकत रस्ता रोको केला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी विविध तीन आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली, तर आर्णीसाठी सोमवार हा ‘आंदोलन’वार ठरला.आर्णी शहरातील विविध समस्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगरपरिषद प्रवेशद्वारासमोर समाधी आंदोलन करण्यात आले. मोठा खड्डा खोदून त्या खड्ड्यात मनसेचे कार्यकर्ते उतरले. प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली. पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती. यासोबतच खुल्या जागांना संरक्षक भिंत, लहान मुलांसाठी खेळ साहित्य, कायमस्वरूपी शाखा अभियंत्यांची नियुक्ती, महिलांसाठी प्रसाधनगृह या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देशमुख, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन येलगंधेवार, राहुल ढोरे, रब शेख, संदीप गाडगे, अभय राकेश, गजू जाधव, पंकज राणे, बबलू देशमुख, संजय देशमुख, मयूर आरणकर, मोहन ठाकरे, दीपक बोरकर, सचिन ठाकरे, आकाश मुंढे, बाळू पावडे, रूपम देशमुख, विकास मुंदे, अक्षय सावंत, अंकित आरसेटवार, गजानन नाईनवार, रवी जाधव, पप्पू पटेल, अंकुश चाफेवाड, गणेश मुरखे आदी सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी निर्मला रासीनकर यांना देण्यात आले. नगरपरिषदेकडून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.साताऱ्यातील महिलांची धडकआर्णी तालुक्याच्या सातारा गावातील पाणीप्रश्न आतापासूनच गंभीर झाला आहे. दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. हा प्रश्न घेऊन सदर गावातील महिलांनी सोमवारी घागरी घेऊन पंचायत समितीवर धडक दिली. गटविकास अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनावर कारवाई झाली नसल्याने महिलांनी प्रचंड रोष व्यक्त केला.गावात असलेले सर्व स्रोत आटले आहे. विहीर अधिग्रहण करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती. यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे सोमवारी या गावातील महिला घागरी घेऊन पंचायत समितीवर धडकल्या. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दरम्यान या गावातील पाणीप्रश्न निकाली काढला जाईल, असे गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण यांनी सांगितले. मोर्चामध्ये मीराबाई राठोड, गोदाबाई जाधव, सरूबाई चव्हाण, कलावती जाधव, आशा राठोड, सुनीता जाधव, मीना राठोड, सुनीता पवार, संगीता राठोड, शांताबाई पवार, सुनीता काकरवार, चंदा तोरणकार, पूजा पवार, निर्मला पवार, शीला राठोड, वनिता पवार, केसरी चव्हाण, दुर्गा इंगोले, रेखा इंगोले, संगीता कुर्मेलवार, सीमा राऊत, नंदा मांदकवार आदींचा सहभाग होता. निवेदन सादर करताना गोविंदा बार्लावार आदींची उपस्थिती होती.नगरपरिषदेच्या कारभारावर रोषआर्णी नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. ४२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना रखडली आहे. देऊरवाडा पुनर्वसन भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज नगरपरिषदेवर धडक दिली. परंतु एकही जबाबदार पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे नागरिकांनी व महिलांनी सोबत आणलेल्या घागरी तेथेच फोडल्या. तसेच नगरपरिषद कार्यालयाला कुलूप ठोकले. त्यानंतर मुख्य रस्त्यावर येवून चक्का जाम आंदोलन सुरू केले. तासभर सुरू असलेल्या या आंदोलनाने वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणेदार संजय खंदाडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात अतुल मुनगीनवार, बालाजी धुमाळ, गोपाल देशमुख, गोपाल बांगर, नंदकिशोर आडेकर, मनोज चारोडे, नंदूभाऊ मात्रे, राजूभाऊ अलोणे, जगदीश घोंगडे, गजानन सुरोशे, भास्कर बन्सोड, अनिल पारधी, दयानंद बन्सोड, मनोज माघाडे, शेख अशफाक, जाकीर सोलंकी, शेख इस्माईल, सलमान खान, आसीफ शेख, नीलेश मस्के, अन्नपूर्णा डहाणे, वंदना भगत, संगीता वंजारे, यास्मीन शेख, फरजाना शहा, सरस्वती बरबडे, मुलनाज खान, किरण नगराळे, आशा कानेकर आदी सहभागी झाल्या होत्या. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाचा इशारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला रासीनकर यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. एकाच दिवशी झालेल्या या तीन आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली, तर बंदोबस्त करताना पोलिसांचीही धावपळ दिसत होती. (शहर प्रतिनिधी)असे झाले समाधी आंदोलन४महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अभिनव समाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाच फूट खोल खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्यात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल देशमुख, विद्यार्थी सेनेचे सचिन यलगंधेवार, शहर अध्यक्ष रब शेख जावून बसले. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.