सध्या शहरात उपलब्ध मनुष्यबळ आणि साधन सामग्रीमध्ये सफाई मोहीम राबविणे सुरू आहे. परंतु शहरात साथीचे आजार वाढल्याने आता ही मोहीम अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी २३ सफाई कर्मचारी होते. आता त्यात १० कर्मचारी वाढविण्यात येणार आहे. उपलब्ध मनुष्यबळांपैकी काही कर्मचारी इतर ठिकाणी पाठवावे लागतात. त्यामुळे शहराच्या सफाई मोहिमेवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.
कचरा संकलनासाठी घंटागाड्या आहेत. मात्र, त्यावर अधिकृत चालकांचीही गरज आहे. चालक नसल्याने सफाई कर्मचारी घंटागाडी चालवित असल्याचे दिसून येत आहे. पाच कर्मचारी या कामात गुंतले आहे. काही कर्मचारी पाणीपुरवठा पाईप लाईनचे लिकेज काढण्यात, तर काही स्मशानभूमीमधील नोंदी घेण्यात गुंतून पडले आहे. यामुळे शहरातील स्वच्छतेसाठी मनुष्य बळ कमी पडत आहे. त्यामुळे आता स्वच्छता मोहिमेला वेग देण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ वाढविले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश पाटील यांनी दिली.