शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

आर्णीच्या महिलांची नगरपरिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:55 PM

शहरातील विविध भागात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहे. धड रस्ते नाही, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे.

ठळक मुद्देविविध समस्या : नगराध्यक्ष, सीओंवर सरबत्ती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शहरातील विविध भागात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहे. धड रस्ते नाही, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. संतापलेल्या महिलांनी बुधवारी थेट पालिकेवर धडक देत नगराध्यक्ष आणि सीओंवर प्रश्नांची सरबत्ती केली.शहरातील ग्रीन पार्क, ड्रिमलँड सिटी, बालाजीनगर, नंदनवन कॉलनी, समर्थनगर आदी परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, नाल्यांची समस्या कायम आहे. वीज वितरणचे खांब पडलेले आहे. मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. पालिकेच्या कचरा गाड्याही येत नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक देत नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांना विविध समस्यांचे निवेदन दिले. समस्या सुटेपर्यंत त्यांच्या कक्षातून उठणार नाही, असा दम भरला. या महिलांची समजूत काढताना नगराध्यक्षांची तारांबळ उडाली होती.रंजना ढाकुलकर, सारिका गडवाले, वीणा पांडे, संध्या बोंडगे, अरुणा नाईक, मनीषा चौधरी, माधुरी वानखडे, सुमन मनवर, अवंतिका हेमके, विद्या तायडे, सुवर्णा चव्हाण, वर्षा गवळे, जयश्री घुगे, कविता जगताप, वंदना मुंजेवार, ज्ञानेश्वरी भवनपुरे, जनाबाई काळे, नीता राठोड, सविता पवार यांच्यासह महिलांनी नगराध्यक्षांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अनेकदा निवेदन देवूनही सुविधा होत नसल्याने संताप व्यक्त केला.लवकरच कामांना सुरुवातनगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी या परिसरातील समस्यांबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही महिलांना दिली. त्यांनी महिलांसोबत थेट परिसर गाठून समस्यांची पाहणीही केली. यामुळे महिलांनी नमते घेत पालिकेतून माघार घेतली.तात्पुरता उपाय म्हणून रस्त्यावर मुरूम, चुरी टाकण्यात येईल. नाल्या, रस्त्यासाठी प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यता घेतली जाईल.- अर्चना मंगामनगराध्यक्ष, आर्णीइस्टिमेट तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविले आहे. मंजुरी मिळताच विकास कामांना सुरुवात केली जाईल.- करणकुमार चव्हाणमुख्याधिकारी, आर्णी