हजारोंची गर्दी : नागरिकांनी जोपासली दहा वर्षांपासूनची परंपराआर्णी : जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या बाबा कंबलपोष यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी दररोज संदल काढण्यात येते. या संदलला पाहण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आर्णीसह जिल्हाभरातून नागरिकांची मोठी गर्दी असते. बुधवारी निघालेल्या संदलमध्ये शहरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी होती. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संघटना संदल काढण्यासाठी पुढाकार घेतात. फुलांची चादर सजवून मेन रोडने शोभायात्रा काढण्यात येवून बाबांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यात येते. गेल्या दहा वर्षांपासून ही परंपरा आर्णीकरांनी जपली आहे. याहीवर्षी मोठ्या प्रमाणात संदल निघत आहे. संदलमध्ये आकर्षक रोषणाई, बॅन्जो, रथ, लायटींग आदी नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. संदलच्या आयोजनासाठी फरान बेग, मिर्झा, शेख इसराईल, शेख इस्माईल, जाकीर सोलंकी, शेख अहमद, रंजित श्रीवास, अंजली ड्रेसस गु्रप आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
आर्णीच्या संदलचे जिल्ह्याला आकर्षण
By admin | Published: February 10, 2017 1:56 AM